ज्या वनातील बहुतांश वृक्षांची पाने ठरावीक ऋतूमध्ये गळून पडतात, ती पानगळ वने. ही वने दोन प्रकारची आहेत. समशीतोष्ण कटिबंधातील ओक, आस्पेन, बीच, बरच, इ. रुंदपर्णी वृक्षांची पानगळ हिवाळ्यापूर्वी होते. भारतातील वनात उन्हाळा सुरू होताना पानगळ होते आणि ते वृक्ष ६ ते ८ आठवडे पर्णहीन असतात. देशातील सुमारे १७% जमीन पानगळ वनांखाली आहे. जमिनीतील ओलावा कमी होणे आणि वनस्पतीतील पाणीसाठा वाचवण्यासाठी पानगळ होणे हे अनुकूलानाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

साधारणपणे ७०० ते २००० मिमी. मोसमी पाऊस शंभरेक दिवसांत पडतो अशा ठिकाणी पानगळ वने असतात. साग, साल, ऐन, मोहवा, शिसम, अर्जुन, पळस, पांगारा, काकड इ. पानगळी वृक्ष या वनात आहेत, त्याचबरोबर वड, िपपळ, आंबा, शेंदरी, चांदडा हे नियमित पानगळ नसणारे, हरित वृक्षही या वनात असतात. भारतातील पानगळ वने दोन प्रकारची आहेत- मध्य भारत आणि उत्तरेला साल वृक्ष  (Shorea robusta), मोठय़ा प्रमाणावर आहेत, तर सातपुडय़ापासून दक्षिणेला साग  (ळीू३ल्लं ॠ१ंल्ल्िर२) जास्त आहेत. पावसाच्या प्रमाणात पानगळी आणि हरित वृक्षांचे प्रमाण बदलते असून, कोरडी पानगळी (दख्खनचे पठार), मिश्र-ओली पानगळी (पश्चिम घाटाचा पूर्व-पश्चिम उतार) आणि ओली पानगळी (पश्चिम घाटाचा दक्षिण भाग, जो दोन मोसमी पावसांच्या सदाहरित वनांमध्ये मिसळतो), असे प्रकार आढळतात.

Landslides disrupt traffic on highways in Arunachal Pradesh
अरुणाचल प्रदेशात भूस्खलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
China's eyes on donkeys in Africa, why is China's hunger for the continent of Africa a headache?
चीनची भूक आफ्रिकन महिलांसाठी का ठरतेय डोकेदुखी?
According to the United Nations Population Fund UNFPA report the estimated population of India is 144 crores
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

चांगली जपणूक झालेल्या पानगळी वनात तीनमजली रचना ( वृक्ष, झुडपे आणि जमिनीवर रांगत वाढणाऱ्या वनस्पती) आढळतात. वन जमिनीवर पालापाचोळा नेहमीच असतो, पण त्याचे कुजणे आद्र्रतेवर अवलंबून. ओल्या कुजणाऱ्या पाचोळ्यात कवके, कृमी, कीटक, तर कोरडय़ा पाचोळ्यात उंदीर, साप, िवचू यांचा धोकादायक आवास. कोरडय़ा पाचोळ्यामुळे  उन्हाळ्यात वणव्यांची भीतीही असते.

या वनात वन्य श्वापदांची संख्या बरीच आहे. सातपुडय़ातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. बांबूची दाट वने असलेल्या ताडोबा जंगलातही वाघ आहेत. पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर लहान वृक्ष आणि गवतावर मोर, गवे दिसतात, तर आणखी दक्षिणेला हत्तींचे कळप असून कधी कधी त्यांचा शेतीला धोका पोहोचल्याच्या बातम्या वाचनात येतात.

प्रा. शरद चाफेकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

सोव्हिएत संघाचा उदयास्त

सेंट पीटर्सबर्ग उर्फ पेट्रोग्राड या झार राजवटीच्या राजधानीत फेब्रुवारी १९१७ मध्ये कामगारांचा संप झाला आणि त्याला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. ही पुढे येऊ घातलेल्या रशियन राज्यक्रांतीतील पहिली घटना.

पुढे मार्च १९१७ मध्ये झालेल्या उठावानंतर झार निकोलस द्वितीयला पदच्युत करून रशियन प्रजासत्ताक स्थापन झाले आणि रशियात मेन्शेविक या राजकीय पक्षाचे हंगामी सरकार सत्तेवर आले. नोव्हेंबर १९१७ मध्ये मेन्शेविक पक्षाचे सरकार जाऊन बोल्शेविक हा राजकीय पक्ष सत्तेवर आला. बोल्शेविक नेता व्लादिमीर इलिच लेनिन याचे नेतृत्व झळाळले. रशियात ‘सोविएत फेडरेटिव्ह सोशालिस्ट रिपब्लिक’ हे आपले सरकार सत्तेवर आणून १९१८ मध्ये सरकारची राजधानी सेंट पीटर्सबर्गहून मॉस्को येथे आणली. या घटना घडत असताना युरोपात पहिल्या महायुद्धाची धुमश्चक्री चालू होती. बोल्शेविक सरकारने जर्मनीशी तह करून पहिल्या महायुद्धातून आपला सहभाग काढून घेतला. मार्क्‍सवादी विचारसरणीच्या समाजवादी बोल्शेविक सरकारने सुरुवातीलाच कामगारांना आपल्या पक्षात सामावून घेऊन त्यातील अनेकांना शस्त्रे दिली आणि त्यांची ‘रेड आर्मी’ ही सनिकी संघटना उभी केली. बोल्शेविकांची रेड आर्मी, समाजवादी व्यवस्थेला विरोध करणारे ‘व्हाइट्स’ आणि बिगर बोल्शेविक समाजवादी यांच्यात, सरकार स्थापनेपासून निर्माण झालेला संघर्ष पराकोटीला जाऊन त्याचे रूपांतर यादवी युद्धात झाले. विरोधकांचे शिरकाण करणे ही रशियन सत्ताधाऱ्यांची नित्याचीच बाब होती.

१९०५ च्या उठावापासून कामगार-शेतकऱ्यांची सोव्हिएत म्हणजे प्रतिनिधी मंडळे अस्तित्वात आली. ही सोव्हिएत मंडळे पुढे एवढी प्रभावी झाली की इ.स. १९२२ मध्ये ‘युनियन ऑफ सोव्हिएत सोश्ॉलिस्ट रिपब्लीक (यु.एस.एस.आर.) हे मध्यवर्ती सरकार सत्तेवर येऊन त्याची राजधानी मॉस्कोत स्थापन झाली. इ.स. १९२२ ते १९९१ या काळात मॉस्कोतील हे सोव्हिएत युनियनचे सरकार सत्तेवर होते. स्तालिनच्या हुकुमशाहीनंतर  येथील राज्यव्यवस्था क्षीण झाल्या. अखेर मिखाइल गोर्बाचोव यांच्या कारकीर्दीत, १९९१ मध्ये सोव्हिएत युनियन विसर्जित करण्यात आले. युक्रेन, अझरबैजान आदी स्वतंत्र देश झाले आणि रशियन फेडरेशनचे सरकार अस्तित्वात आले. व्लादिमीर पुतीन हे रशियन फेडरेशनचे सध्याचे अध्यक्ष आहेत.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com