News Flash

कुतूहल : सोडिअम

सोडिअम धातू शुद्ध स्वरूपात निसर्गात आढळत नाही.

सोडिअम हे अणुक्रमांक ११ असलेले तिसऱ्या आवर्तनातील आणि पहिल्या गणातील मूलद्रव्य! अणूमध्ये इलेक्ट्रॉनच्या तीन कक्षा असणारा सोडिअम हा चंदेरी रंगाचा अल्कली धातू आहे. पाण्यापेक्षा हलका असलेला हा धातू चाकूने कापण्याइतका मृदू असतो. पृथ्वीवर सापडणाऱ्या अनेक मूलद्रव्यांच्या विपुलतेमध्ये सोडिअमचा सहावा क्रमांक लागतो. चमचमणाऱ्या पिवळ्या रंगाची ज्योत देणारा सोडिअम आपल्या बाह्य़ इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये असणाऱ्या एका इलेक्ट्रॉनमुळे अतिशय क्रियाशील आहे. हवेशी संपर्क येताच सोडिअमचे ऑक्साईड तयार होते. पाण्याशी संपर्क येताच स्फोटक अभिक्रिया होऊन हायड्रोजन आणि सोडिअम हायड्रॉक्साईड तयार होते. यासाठी सोडिअम तेलात किंवा निष्क्रिय वायूत ठेवला जातो.

सोडिअम धातू शुद्ध स्वरूपात निसर्गात आढळत नाही. सोडिअम हा फेल्डस्पार, सोडालाइट, क्रायोलाइट, झिओलाइट, हॅलाइट (सोडिअम क्लोराईड) आणि नॅट्रॉन अशा अनेकविध क्षारांच्या स्वरूपात सापडतो. आपल्या परिचयाचे सोडिअमचे क्षार म्हणजे नेहमीच्या वापरातील मीठ. मीठ म्हणजेच सोडिअम क्लोराईडच्या स्वरूपात हे मूलद्रव्य समुद्रात आणि खाऱ्या तलावांमध्ये आढळते. सोडिअम काबरेनेट हे आणखी एक परिचित संयुग, जे साबणामध्ये आणि कठीण पाणी (खनिजयुक्त पाणी) मृदू करण्यासाठी वापरले जाते. सोडियम बाय काबरेनेट खायचा सोडा म्हणूनही वापरले जाते.

सोडिअमचा वापर संयुगाच्या स्वरूपात केल्याचे फार पूर्वीपासून आढळते. सोडिअम क्षारांचे वेफर्स रोमन सनिकांना त्यांच्या वेतनाबरोबर दिले जायचे. तसेच मध्य युरोपात सोडानम हे संयुग डोकेदुखीवर औषध म्हणून वापरले जायचे. सनिकांचे वेतन (लॅटिन शब्द सॅलेरियम) आणि सोडानमयावरून सोडिअमच्या नावाचा प्रवास सॅलॅरिअम ते सोडिअम असा सुरू झाला.

सर हम्फ्री डेव्ही या शास्त्रज्ञाने १८०७ मध्ये सोडिअम हायड्रॉक्साईडचे विघटन करून सोडिअम शुद्ध स्वरूपात मिळवला. लुईस जोसेफ-गे-लुझॅक आणि लुईस जेक्स थेनार्ड या फ्रांसच्या शास्त्रज्ञांनी कॉस्टिक सोडा आणि लोखंडाचा चुरा यांच्या मिश्रणाला उष्णता देऊन सोडिअम मिळवला. १८०९ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ लुडविग विल्हेम गिल्बर्ट यांनी हम्फ्री डेव्ही यांचे संशोधन प्रसिद्ध करताना सोडिअमच्या नावात नॅट्रिअम असा बदल केला आणि १८१४ मध्ये जॉन्स जॅकोब बर्झेलिअस यांनी सोडिअमची संज्ञा नॅट्रिअम या लॅटिन नावावरून  ‘ठं’ अशी प्रसिद्ध केली.

डॉ. मनीषा कर्पे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 5:40 am

Web Title: sodium
Next Stories
1 जे आले ते रमले.. : तंजावर ग्रंथालयाचे प्रेरणास्थान – श्वार्ट्झ
2 तंजावर राज्यपालक श्वार्ट्झ
3 निऑन दिवे
Just Now!
X