गणिताच्या इतिहासातील काही मोजक्या सोनेरी पानांचा आपण आढावा घेतला. आता अंक व संख्या यांच्या रम्य राज्यात प्रवेश करू. शून्य (०), एक (१), दोन (२), तीन (३), चार (४), पाच (५), सहा (६), सात (७), आठ (८), नऊ (९) या दहा अंकांची दशमान पद्धती ही भारताने जगाला दिलेली बहुमूल्य देणगी आहे. या अंकांना ‘हिंदूू-अरेबिक न्युमरल्स’ म्हणतात; कारण भारतात उगम पावलेली ही अंकचिन्हे अरब व्यापाऱ्यांनी भारतातून मसाल्याचे पदार्थ युरोपमध्ये नेताना हिशेबासाठी वापरली.

astrology
१९ मे ला वर्षातील सर्वात मोठा राजयोग, ‘या’ तीन राशींना मिळणार बक्कळ पैसा
loksatta analysis causes of forest fires in uttarakhand
विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

‘आर्यभटीय’ या ग्रंथात एक, दश, शत, सहसस्र, अयुत, नियुत (१०५), प्रयुत (१०६), कोटी (१०७), अर्बुद (१०८), वृंद (१०९) या दशगुणोत्तरी संज्ञा आढळून येतात. तेथे दहाच्या गुणोत्तराबद्दल म्हटले आहे की ‘‘स्थानात् स्थानं दशगुणं स्यात्।’’ ‘यजुर्वेदा’त परार्ध या बाराव्या स्थानापर्यंत संज्ञा आहेत. प्राचीन संस्कृतींमध्ये ब्राह्मी, ग्रीक, हिब्रू, रोमन, चिनी अंकलेखनपद्धतीही होत्या, पण ती अंकचिन्हे वापरून मोठय़ा संख्या लिहिणे किंवा गणिती क्रिया करणे सुलभ नव्हते. दशमान पद्धतीने अंकांना स्थानिक मूल्य देऊन विकसित झालेली पद्धती यासाठी खूपच सोयीची असल्याने ती आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकृत झाली. भारताच्या राज्यघटनेतही याच अंकांना मान्यता देण्यात आली आहे.

दशमान संख्यालेखनातील प्रत्येक अंकाला एक दर्शनी किंमत आणि एक स्थानिक किंमत असते. उदाहरणार्थ, ५१५२५ या संख्येत तीन वेळा आलेल्या ५ या अंकाची दर्शनी किंमत ५ असली तरी स्थानिक किंमत एकक स्थानी ५, शतक स्थानी ५०० आणि दशहजार स्थानी ५०,००० आहे. संख्या लिहिण्यासाठी उजवीकडील पहिल्या स्थानापासून अंकांच्या स्थानिक किमतीनुसार एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी.. हे शब्द आपण मराठीत उपयोगात आणतो. दशमान पद्धतीचा विस्तार होऊन दशांश चिन्हासह अपूर्णाकातही संख्या लिहिता येत असल्यामुळे संख्यालेखन सुलभ झाले. जसे ५६/१०००० ही व्यवहारी अपूर्णाकातील संख्या ०.००५६ अशी दशांश अपूर्णाक रूपात लिहिली जाते. अंशित दशमान संज्ञा दशांश, शतांश, सहस्रांश.. अशा आहेत.

मापनाच्या मेट्रिक पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान, द्रवाचे आकारमान मोजण्यासाठी डेसी, सेंटी, मिली, मायक्रो (१०-६), नॅनो (१०-९), पिको

(१०-१२).. इत्यादी शब्दांचा उपयोग केला जातो. जसे, मायक्रोमीटर, मिलिग्रॅम, इत्यादी. गुणित दशमान संज्ञांसाठी डेका, हेक्टो, किलो, मेगा (१०६), गिगा (१०९), टेरा (१०१२), पेटा (१०१५), एक्झा (१०१८), झेट्टा (१०२१), योट्टा (१०२४) आदी शब्दांचा उपयोग केला जातो.

– प्रा. दिलीप गोटखिंडीकर

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org