दक्षिण आशियातील प्राचीन शेतीपद्धतींबाबत संशोधन व प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने १९९४ साली सिकंदराबाद येथे ‘एशियन अ‍ॅग्री-हिस्ट्री फाऊंडेशन ट्रस्ट’ स्थापन झाला. डॉ. यशवंत नेने, एस्. एम्. निगम, पी. एम्. तांबोळी अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांनी या स्वयंसेवी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
गेली १७ वष्रे संस्थेतर्फे ‘एशियन अ‍ॅग्री-हिस्ट्री’ हे नियतकालिक प्रकाशित केले जात आहे. शेतीसंबंधित अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, वानिकीशास्त्र, भूगोल, पशुपालन, पीकवैविध्य, पीकमशागत, कापणी, मळणी, आंतरमशागत, सिंचन, पीक संरक्षण, बियाणे, पेरणी, माती, उपयुक्त वनस्पती, स्त्रिया व शेती अशा अनेक विषयांवर लेख यात प्रकाशित केले जातात.
भारतीय शेतीबाबतचे ज्ञान बहुतांशी संस्कृत किंवा पíशयन दुर्मीळ ग्रंथांमध्ये पाहायला मिळते. नव्या पिढीला त्यांचा परिचय होण्यासाठी संस्थेने त्यांचे इंग्रजीत अनुवाद केले. ऑक्सफोर्ड येथील बॉडलेन ग्रंथालयातील मूळ ‘वृक्षायुर्वेद’ ग्रंथाची फिल्म करून त्याचा अनुवाद इंग्रजी, मराठी, िहदी, तेलगू, कन्नड, तमीळ या भाषांत करून आपल्या कार्याची सुरुवात संस्थेने केली. संस्कृतमधील कृषी पराशर, कश्यपीय कृषी सूक्ती, विश्ववल्लभ, कृषीशासनम्, उपवनविनोद, मृगपक्षीशास्त्र, कृषीगीता (मल्ल्याळम), लोकोपकार (कन्नड), नुस्खा दर फन्नी-फलाहत (पíशयन), भारतीय शेतीचा वारसा, प्राचीन व मध्ययुगीन भारतीय शेती (इंग्रजी) अशा अनेक पुस्तकांचेही अनुवाद संस्थेने केले. प्राचीन शेतीविषयक साहित्याचे संदर्भ ग्रंथालय संस्थेने तयार केले.
भारतीय शेतीचा वारसा, प्राचीन व आधुनिक शेतीपद्धती यांचा मेळ या विषयांवर संस्था देशभर व्याख्याने, परिषदा, कार्यशाळा, परिसंवाद आयोजित करते. ईशान्येकडील राज्यांतील चहाच्या मळ्यांत तर आता यामुळे परंपरागत पद्धतीने शेती केली जात आहे. संस्थेच्या प्रयत्नांमुळे २००४  मध्ये ‘प्राचीन भारतीय शेती’ या विषयाचा समावेश काही शेतकी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात आला. शेतकऱ्यांना प्राचीन शेतीतंत्रांबाबत ओळख करून देण्यासाठी संस्थेने शास्त्रज्ञांना आíथक आणि तांत्रिक पाठबळ पुरविले.
आज उदयपूर, पंतनगर, सिलिगुडी येथे संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. अशा शाखांद्वारे त्या परिसरातील प्राचीन लिपींचा शोध घेणे, भारतातील सर्व विद्यापीठांत प्राचीन शेतीविषयक अभ्यासक्रमाचा समावेश करणे, पदव्युत्तर शिष्यवृत्त्या देणे, वृक्षायुर्वेद संशोधन केंद्रे स्थापन करणे अशा गोष्टींचा पाठपुरावा संस्था करत आहे.
प्रतिनिधी मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १२ फेब्रुवारी
१९४३ > कवी सतीश हरिश्चंद्र काळसेकर यांचा जन्म. त्यांचे ‘इंद्रियोपनिषद’, ‘साक्षात’, ‘विलंबित’ आदी काव्यसंग्रह प्रकाशित झाले, तसेच ‘कविता लेनिनसाठी’ या लेनिनवरील जगभरच्या विविध भाषांतील कवितांच्या अनुवाद-संग्रहाचे संपादन त्यांनी केले. लोकवाङ्मय गृहाच्या ग्रंथप्रसार कार्याशी काळसेकर संबंधित आहेत. लघु नियतकालिकांच्या चळवळीत आजही राहून ते ‘आपले वाङ्मय वृत्त’ हे  लोकवाङ्मय गृहाचे मासिक ते चालवतात. याच मासिकातील लेखांचे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे संकलनही प्रसिद्ध झाले आहे.
१९५० > संस्कृत व्याकरणशास्त्राचे गाढे अभ्यासक नारायण दाजीबा वाडेगावकर यांचे निधन. ‘परिभाषेन्दुशेखर’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
१९९८ > ‘आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा.. ओलांडाव्याच लागतात, रावणांना सामोरे जावेच लागते’ अशा शब्दांत आजच्या स्त्रीची वेदना मांडणाऱ्या, स्त्रीच्या अंतर्मुख भावनांना वाचा देणाऱ्या कवयित्री पद्मा ऊर्फ पद्मा गोळे यांचे निधन. ‘प्रीतिपथावर’, ‘नीहार’, ‘स्वप्नजा’, ‘आकाशवेडी’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. दोन पुरुषपात्रविरहीत नाटके व काही बालनाटिकाही त्यांनी लिहिल्या होत्या.
संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian agree history foundation trust
First published on: 12-02-2013 at 12:07 IST