भानू काळे

पोर्तुगीज १५१० साली गोव्यात आले आणि १९६१ साली त्यांनी भारत सोडला. मुंबई-वसई भागावरही त्यांनी दीडशे वर्षे राज्य केले. या साडेचारशे वर्षांत त्यांचे बरेच संस्कार आपल्यावर होणे अपरिहार्यच होते. ‘बॉम्बे’ किंवा ‘बम्बई’ शब्दाची व्युत्पत्तीच बाँ बइआ ( Baun Bahia) म्हणजे उत्तम बंदर या पोर्तुगीज शब्दावरून झालेली आहे.

External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
vk saxena eid statement
“देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यावर नाही, तर मशिदींमध्ये केले गेले नमाज पठण”, दिल्लीच्या नायब राज्यपालांचं विधान चर्चेत!
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा
K-Pop craze spread to every corner of India
K-Popसाठी त्यांनी घर सोडलं, पण…मुर्शिदाबादमध्ये त्यावेळी काय घडले?

पोर्तुगीज भाषेतून आलेले अनेक शब्द मराठीत पूर्णत: मिसळून गेले आहेत. उदाहरणार्थ, ‘पाव’. ब्रेडसारखा इंग्लिश शब्द टाळून त्याला ‘पाव’ म्हणण्यात आपले मराठीप्रेम सिद्ध होत नाही, कारण ‘पाव’ शब्दही पोर्तुगीज आहे! अनेक नवीन वस्तू पोर्तुगीजांनी आणल्या आणि त्यांच्याबरोबरच वस्तुवाचक पोर्तुगीज शब्दही मराठीने स्वीकारले. बटाटा, कोबी ही भाज्यांची नावे किंवा अननस, हापूस, पायरी, पपई ही फळांची नावे मूळ त्यांचीच.

साबण, बशी, घमेले, व्हरांडा, अलमारी, चावी, बादली, पिंप, बिजागरी, इस्त्री, परात हे वस्तुदर्शक मराठी शब्दही मूळचे पोर्तुगीज आहेत. पाद्री, लिलाव, नाताळ हेही त्यांचेच शब्द. ‘पगार’ हा सर्वाचा आवडीचा शब्द! तोही ‘पागा’ म्हणजे वेतन या पोर्तुगीज शब्दातून आला आहे. ‘केलेल्या कामाचा नियमित तारखेला मोबदला देणे,’ ही संकल्पना ‘पगार’ या शब्दातून व्यक्त होते आणि ‘किंमत’, ‘बक्षीस’ किंवा ‘इनाम’ या रूढ शब्दांपेक्षा ती अगदी वेगळी आहे. जे लोक भाडय़ाच्या घरात राहतात, त्यांना आपली जागा सोडताना मूळ मालकाकडून बरीच मोठी रक्कम ‘पागडी’ म्हणून मिळते. या पागडी शब्दाची व्युत्पत्ती देखील ‘पागा’ शब्दाच्या ‘मोबदला’ याच अर्थच्छटेतून झाली असावी. कृ. पां. कुलकर्णी यांच्या ‘मराठी व्युत्पत्ति कोशा’नुसार ‘अय्या’ शब्द तीन अर्थानी वापरला जातो आणि त्यातील प्रत्येकाची व्युत्पत्ती वेगवेगळी आहे. मुलींच्या तोंडी (तो कोश बनला त्या काळात) येणारा उद्गारवाचक शब्द या अर्थाने तो ‘अय्यये’ या कानडी शब्दापासून बनलेला आहे. ‘अय्या’चा दुसरा अर्थ आहे तमिळ भाषेत ब्राह्मण पुरुषाला उद्देशून वापरले जाणारे संबोधन. त्या अर्थाने तो शब्द ‘आर्य’ या संस्कृत शब्दाचे तद्भव रूप आहे. पण याहून अगदी वेगळा अर्थही ‘अय्या’ शब्दाला आहे व तो म्हणजे मुले सांभाळणारी बाई किंवा आया. आणि त्या अर्थाने तो शब्द ‘aia’ (उच्चार आया) या पोर्तुगीज शब्दापासून आलेला आहे!