डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर, अल्बर्ट हार्वर्ड, मासानोबू फुकुओका आणि कोल्हापूरचे श्रीपाद अच्युत दाभोळकर यांनी शेतीकडे समग्रतेने पाहिले. शेती विषयावर चिंतन करून, त्यानुसार विविध प्रयोग करून सर्वाना समजेल, पचेल असे शेतीचे तंत्रज्ञान विकसित केले. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्यांचे प्रयोग इंदूरच्या आमच्या रंगवासा जैविक ग्राम संस्थेत आम्ही करून बघितले.
फुकुओका यांनी गव्हावर केलेला प्रयोग आम्ही करून बघितला. त्यांनी बियाणांना मातीत कालवून त्याच्या गोळ्या (पॅलेट) करून त्यांना शेतात एक-एक फूट अंतरावर (रोपांमधील तसेच रांगांमधील अंतर) लावायला सांगितले होते. आम्ही आमच्या अध्र्या एकर शेतातील पाच घमेली माती घेऊन ती कुटून बारीक केली. त्यात पाच घमेलं कुजलेलं शेणखत घातलं. त्यात ५०० ग्रॅम गव्हाचं बी (मुंडा पिस्सी जात), २०० ग्रॅम हरभरा, ५० ग्रॅम मेथी, ५० ग्रॅम तीळ व ५० ग्रॅम मोहरी यांचं बियाणं मिसळलं. यात हळूहळू गोमूत्र शिंपडत त्याचा आटय़ासारखा गोळा तयार केला. पुन्हा त्याच्या लहान-लहान गोळ्या केल्या. शेतात एक-एक फुटावर मूठभर गांडूळ खत ठेवून त्यावर गोळ्या ठेवत गेलो. यावर पुन्हा मूठभर गांडूळ खत ठेवलं. झारीने या गोळ्यांच्या वर पाणी सोडलं. नंतर पंधरा दिवसांच्या अंतराने चार वेळा याला पाणी दिलं. रोपं उगवल्यावर गहू व काही ठिकाणी मोहरी सोडून मेथी, तीळ व हरभऱ्याची रोपं काढून टाकली. फुटवा जोमदार आला. टोकलेल्या प्रत्येक ठिकाणी कमीतकमी २० व जास्तीतजास्त ४५ फुटवे (टिलर्स) आले. पीक जोमदार होते. पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात केली होती. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात कापणी केली. साडेपाच क्विंटल गहू व ५० किलो मोहरी मिळाली. म्हणजे, एकरी ११ क्विंटल गहू व १ क्विंटल मोहरी मिळाली.
या प्रयोगात फुकुओकाची गोळी पेरणी व दाभोळकरांची सूर्यशेती या दोन्हींचा अंतर्भाव होता. रोपांमध्ये एक-एक फूट अंतर सोडल्याने पानांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाला. यामुळे उत्पादन वाढले. निविष्ठा न वापरल्याने मजूर खर्च सोडता इतर खर्च आला नाही.
– अरुण डिके (इंदूर)    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी.. : अजित फडके
दिनांक ०२-०९-२०१२च्या रविवारी अजित गेला. जसा जगला तसाच शांतपणे गेला. वारही निवडला रविवार. नाही तर इतर लोकांचे कार्यक्रम बिघडतील. याने जन्मभर कोणालाही त्रास दिला नाही. लोकांनीच याला त्रास दिला, परंतु .. वाटत असे क्रियेचा अभाव। तरी त्याच्या हातांमधे होता एक स्वभाव। ते जोडून करत होते। नमस्कार।।
अभय देण्यासाठी। हात करत असे उभा। जो गांजला। त्याला गोंजारत असे।।
दु:ख आणि भीतीचा। करतसे मार्दवतेने परिहार। अगदी मृदूपणे। हळुवार।।
या ओव्या ज्ञानेश्वरांच्या अहिंसा या विषयावरच्या परंतु माझ्यासारख्याला त्या अजितमुळेच समजल्या. अर्थात या गोष्टी स्वभावत:च असाव्या लागतात, हातपाय शेवटी इंद्रिये असतात. माणसाच्या बाह्य क्रियांना जे रूप येते ते अंतरंगावर ठरते. ज्ञानेश्वर म्हणतात-
जी असते वृत्ती। ती उठून बसते मनी। मग ती वाणी आणि दृष्टी। हातातही तीच उमटते।।
दृष्टीबद्दलच बोलायचे झाले तर अजितच्या दृष्टिक्षेपाचे वर्णनही ज्ञानेश्वरीत सापडते.. सोडला दृष्टीतला ताठरपणा। भुवया मोकळ्या ढाकळ्या केल्या। गडबड किंवा डौलीपणा। नाही कुटिलता किंवा ओशाळेपणा।
फसवणूक आणि संशयाचा। त्याग केला।।
आणि अजित बोलत असे तेव्हा खालील ओव्यांचा अनुभव येत असे.
अधिक उणा शब्द। दुखवेल कोणाचे वर्म। होईल संशय उत्पन्न। हे सगळे टाळले। नाही उपरोध किंवा वितंडवाद। मर्मभेद किंवा पालहाळ। टर उडवणे। किंवा छळवाद। स्नेह पाझरे पुढे। मागून चालायची अक्षरे। शब्द नंतर अवतरे। आंधीकृपा दिसे।।
अजित व्यवसायाने शस्त्रक्रियेतला वाकबगार म्हणून नावाजलेला, परंतु त्याची कीर्ती अगदी शेवटी शेवटी साता समुद्रापार गेली. ते होण्यास वेळ लागला कारण याचा स्वभाव. ज्ञानेश्वरांनी अज्ञानाच्याही खुणा सांगितल्या आहेत.
प्रतिष्ठेवर जो जगतो। मानसन्मानाची वाट पाहतो। सत्काराने ज्याला होतो। हर्ष.
विद्येचा घालतो पसारा। पुण्यकर्माची पिटतो दवंडी। जेवढे काही करतो। सारे कीर्तीसाठी।।
यातले अजितने तसूभरही केले नाही. सन्मान आले आणि गेले..
नदी आणते महापूर। परंतु समुद्र ठरतो पुरेपूर। घेतो पोटात। सगळे पाणी
मी सहन करतो आहे काही। किंवा मी मिळवले। असला भावच नाही मुळी।
जे अंगावर चालून येते। करून टाकतो आपलेसे। तितिक्षाच नाही। त्याच्या मनी।  
अजित होता तेव्हा एक आधार वाटत असे. पण त्याने तरी किती वर्षे किती लोकांना सांभाळायचे?
रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fukuoka dabholkar experiment
First published on: 09-04-2013 at 12:46 IST