Kutuhal earth magnet Amazing misunderstanding people William Gilbert ysh 95 | Loksatta

कुतूहल : पृथ्वी हाच मोठा चुंबक

प्राचीन काळापासूनच चुंबक आणि त्याचे गुणधर्म याविषयी मानवाच्या मनात औत्सुक्य आहे. चुंबकाच्या आश्चर्यकारक गुणधर्माबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज होते.

कुतूहल : पृथ्वी हाच मोठा चुंबक
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

 हेमंत लागवणकर, मराठी विज्ञान परिषद

प्राचीन काळापासूनच चुंबक आणि त्याचे गुणधर्म याविषयी मानवाच्या मनात औत्सुक्य आहे. चुंबकाच्या आश्चर्यकारक गुणधर्माबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज होते. पृथ्वीच्या उत्तरेकडे एक प्रचंड मोठा लोखंडी पर्वत असावा आणि त्यामुळेच चुंबकसूची उत्तर दिशेकडे आकर्षित होऊन उत्तर दिशा दाखवते, असा काही संशोधकांचा समज होता.

ब्रिटिश शास्त्रज्ञ विल्यम गिल्बर्ट (१५४४-१६०३) यांनी १६०० मध्ये ‘दि मॅग्नेट’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि चुंबकाबद्दलचे सगळे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. चुंबक आणि चुंबकाचे गुणधर्म याविषयीचे त्यांचे संशोधन तब्बल १७ वर्षे सुरू होते. पृथ्वी हा एक मोठा चुंबक असून तिचे चुंबकीय ध्रुव हे भौगोलिक ध्रुवाच्या ठिकाणी असतात; त्यामुळे चुंबकसूची दक्षिणोत्तर दिशा दाखवते, हा विचार त्यांनीच मांडला. अर्थात, पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव हा दक्षिण टोकावरील अंटाक्र्टिक प्रदेशात आणि पृथ्वीचा चुंबकीय दक्षिण ध्रुव उत्तरेकडे असलेल्या आक्र्टिक प्रदेशात आहे.

चुंबकसूची उत्तर- दक्षिण दिशेत स्थिर राहते, असे जरी आपण म्हणत असलो तरी ती अगदी अचूक उत्तर- दक्षिण दिशा दाखवत नाही. विल्यम गिल्बर्ट यांच्या काळात म्हणजे सुमारे १५८० साली लंडनमध्ये ठेवलेल्या चुंबकसूचीच्या उत्तर ध्रुवाचे टोक अचूक उत्तर दिशेऐवजी उत्तरेच्या एक अंश पूर्वेकडे होते. खरी उत्तर दिशा (म्हणजेच पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव) आणि चुंबकसूचीने दाखवलेली उत्तर दिशा यांच्यातल्या कोनाला ‘चुंबकीय नति’ असे म्हणतात. काळानुसार चुंबकीय नति बदलते. चुंबकीय नतिचे मूल्य ऋण ९० अंश ते धन ९० अंश अशा एकूण १८० अंशांच्या मर्यादेत बदलते.

चुंबकीय नति जशी काळावर अवलंबून आहे, तशीच ती विशिष्ट स्थानावरसुद्धा अवलंबून आहे. स्थान बदलले की चुंबकीय नतिसुद्धा बदलते, हे सर्वप्रथम १४९२ साली सागरी प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस याच्या निदर्शनास आले होते. चुंबकसूचीने दाखवलेली दिशा अचूक मानून सागरी प्रवास केल्यास आपण अपेक्षित ठिकाणी न पोहोचता वेगळय़ा ठिकाणी पोहोचल्याचे त्याला आढळले.

पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव हे पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवांवर नसल्याने खरी उत्तर दिशा आणि चुंबकसूचीने दाखवलेली उत्तर दिशा यांच्यात फरक पडतो. पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांचे नेमके स्थान कॅप्टन जेम्स रॉस यांनी १८३१ मध्ये निश्चित केले. अर्थात, हे स्थान काळानुसार बदलत जात असल्याने चुंबकीय नतिसुद्धा काळानुसार बदलते.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कुतूहल : चुंबकीय दगड..

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
डॉ. आंबेडकर स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खर्चास आठवले यांचा आक्षेप  
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू
‘जी २०’ अध्यक्षपदाचा प्रचार नाटकी; काँग्रेसची टीका
शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ; अलिबाग, मुरुड मतदारसंघात २५२ कोटींचा निधी