‘‘या तरुण सुंदर युवतींच्या गालावर गुलाब फुलवायचे काम शेवटी हिमोग्लोबिनच करतंय आणि हिमोग्लोबिनवर संशोधन करता करता या कपोलावरच्या गुलाबांना बघायला पण मला आवडतंय,’’ असे म्हणाले होते लिनस पौलग १९६६ मध्ये एका समारंभात!

या प्रसंगाच्या अगोदर ७५ वर्षांपूर्वी त्यांचे हिमोग्लोबिनवरचे संशोधन पूर्ण होऊन त्यावर शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. १९३६ च्या सुमारास त्यांनी चाल्रेस कोरयील यांच्यासोबत, हिमोग्लोबिन, ऑक्सिजनबरोबर संयोग पावून शरीरात पुरवला जातो आणि कार्बनडाय ऑक्साइडदेखील हिमोग्लोबिनच्या मदतीने फुफ्फुसापर्यंत आणला जातो, हे नमूद केले होते.

प्रत्येक हिमोग्लोबिनचा रेणू चार ऑक्सिजनचे रेणू पकडतो. कार्बनडाय ऑक्साइड मात्र ऑक्सिजनच्या रेणूशी स्पर्धा न करता ग्लोबिन या प्रथिनाशी संधान बांधतो. हे शास्त्रीय सत्य पौिलग यांनी जगासमोर १९३६ सालीच आणले होते. पौिलगच्या संशोधनाला खंड नव्हता. १९९४ मध्ये या जगाचा निरोप घेण्याअगोदर त्यांनी सिकल पेशी पंडुरोग होण्यामागची रेण्वीय कारणे शोधून काढण्याला मदत केली.

पौिलगच्याही अगोदर मॅक्स पेरुत्झ या शास्त्रज्ञाने हिमोग्लोबिनच्या रचनेची प्रतिमा तयार केली होती. त्यांनी आपल्या आयुष्याची पन्नास वष्रे हिमोग्लोबिनच्या एका रेणूपाठी खर्ची घातली. हिमोग्लोबिनची रेण्वीय प्रतिमा तयार करणारे हे पहिले शास्त्रज्ञ होते.

निरनिराळ्या रेणूंपकी हिमोग्लोबिनवर सर्वात जास्त संशोधन झाले आहे. अलीकडच्या काळात जैववैद्यकीय शास्त्रात या रेणूला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. रेण्वीय अनुवंशशास्त्रात ं-ग्लोबिन आणि ु- ग्लोबीन जनुकांवर विशेष संशोधन चालू आहे. निरनिराळ्या असाध्य जनुकीय रोगांवर मात करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरेल. गर्भाचे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी किंवा स्टेम पेशीचा वापर करून जनुकीय रोग ठीक करण्यासाठी हे संशोधन वापरण्यात येते. हिमोग्लोबिनचे स्वरूप ठरवणारे जनुक २ क्रमांकाच्या गुणसूत्रावर असते आणि त्याला इउछ11अ जनुक म्हटले जाते.

हिमोग्लोबिनच्या साहाय्याने जैविक उत्क्रांती कशी झाली यावरदेखील काही शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. अ‍ॅलान स्केच्तर यांनी याबाबत इतके काम केले आहे की, त्यांना हिमोग्लोबिनोजीस्ट असेच संबोधले जाते.

-डॉ. नंदिनी नेरुरकर- देशमुख

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

 

आशापूर्णादेवी : पुरस्कार स्वीकारल्यानंतरची ‘प्रतीक्षा’..

१९७६ चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर आशापूर्णादेवी यांनी आपल्या लेखनाविषयी काही विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या- ‘सध्या देशात अनेक साहित्य पुरस्कार दिले जातात. पण ज्ञानपीठ पुरस्कार हा सगळ्यांहून वेगळा, ‘भव्य, दिव्य’ पुरस्कार आहे. वास्तविकपणे मनोरंजन हेच साहित्याचं कार्य आहे. ते राष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय करून देणारं असतं. आपला भूतकाळ सुरक्षित ठेवणं, वर्तमान गतिशील बनवणं आणि भविष्याची रचना करणं हेच साहित्याचं दायित्व.

मी साहित्याच्या क्षेत्रात कशी आले आणि माझे प्रेरणास्रोत कोण होते, या प्रश्नांना मला नेहमीच तोंड द्यावं लागलेल आहे. खरं म्हणजे याची सुरुवात अकस्मातच झाली. तेव्हा मी १३ वर्षांची होते. त्यावेळी मनामध्ये काही लिहावं असा विचार आला. ही इच्छा इतकी प्रबळ होती, की काही मिनिटातच एका कवितेने माझ्या ओंजळीत जन्म घेतलेला होता. मी ती कविता एका प्रसिद्ध बालमासिकासाठी पाठवून दिली. जर मी कविता साभार परत आली असती, तर कदाचित माझं लेखन तिथेच थांबलं असतं; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे की ती कविता केवळ प्रकाशितच झाली नाही, तर मी अजून साहित्य पाठवावं म्हणून संपादकांकडून मला वारंवार आग्रह होऊ लागला. नंतर एका साहित्य स्पर्धेत मला प्रथम पुरस्कार मिळाल्यानंतर माझा उत्साह द्विगुणीत झाला. त्यावेळी मी केवळ १५ वर्षांची होते.

माझे विचार पुरुषांपेक्षा स्त्रियांवर केंद्रित होणं स्वाभाविक होतं. कारण मला लहानपण आणि तरुणपण रुढीवाद्यांच्या गोतावळ्यात घालवावं लागलं. स्त्रियांच्या असहाय अवस्थेनं आणि अव्यक्त दु:खानं मला अत्याधिक विचलित केलं. या सत्यामुळे मी दिवसेंदिवस दु:खी होत गेले आणि माझ्या मस्तकात याविषयी विद्रोहाचा पर्वत उभा राहिला. ‘प्रथम प्रतिश्रुति’ची नायिका ‘सत्यवती’. ही माझ्या हृदयातील मौन विरोधांचंच प्रतीक होती- हे कबूल करायला हवं.

मी आधुनिक सामाजिक विकासाची साक्षीदार आहे. हा एक मला मिळालेला आशीर्वादच आहे. पण तरीही मुक्तीची ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याकडे येणाऱ्या पिढीला लक्ष द्यावं लागेल.  आमचा देश उत्सुकतेनं  या नव्या पावलांच्या आवाजाची प्रतीक्षा करतो आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com