‘लाल सागरी शैवाल’ हा सागरी शैवालातील सर्वात जुना आणि मोठा गट आहे. हे शैवाल सागरात अधिक  खोल पाण्यात मिळते. याला लाल रंग त्यातील फायकोबिलीन (फायकोइरिथ्रीन व फायकोसायनीन) या रंगद्रव्याद्वारे मिळालेला असतो. या रंगद्रव्यामध्ये कमी तरंग लांबीचा निळा प्रकाश शोषून घेण्याची क्षमता असल्याने लाल शैवाल खोल पाण्यातही प्रकाशसंश्लेषणाचे कार्य व्यवस्थित करू शकते. लाल शैवालाच्या रचनेत व आकारात मोठय़ा प्रमाणात विविधता दिसून येते. काही तंतू आकाराचे तर काही पक्ष्यांच्या पिसांसारखे, काही शाखित तर इतर चपटय़ा स्वरूपात आढळतात. ग्रासीलारिया, जेलिडियम, सोलिएरा, हिप्नीया, पोरफायरा, हॅलिमेनीया, एकँथोफोरा, ग्रॅटिलोपीया अशा लाल शैवालांच्या काही प्रजाती आहेत. लाल शैवालांत मोठय़ा प्रमाणात प्रथिने आढळतात. विशेषत: जेल स्वरूपातील कबरेदके ही या शैवालांची महत्त्वाची ओळख होय.

अनेक शतकांपासून जपानी आणि चिनी संकृतीत लाल शैवालाचा वापर पोषक आहार म्हणून केला जात आहे. यातील प्रथिनांचे प्रमाण जमिनीवरच्या वनस्पतींपेक्षा प्रति एकर पाच पटींहून अधिक असते. मोठय़ा प्रमाणात प्रथिने असणे आणि नैसर्गिक लाल रंग यामुळे हे शैवाल मांसाहाराला उत्तम पर्याय ठरते. पामेरीया पामेरा हे लाल शैवाल तळल्यावर अतिशय स्वादिष्ट आणि डुकराच्या मांसासारखे लागते. पोरफायरापासून ‘नोरी’ (जपान) आणि ‘निम’ (कोरिया) आणि ग्रासिलारीयापासून ‘आगोनारी’ हे खाद्यपदार्थ तयार केले जातात. लोरेनशीयामध्ये खूप प्रमाणात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स आढळतात.

Pioneer Of Artificial Intelligence Yoshua Bengio
कुतूहल : ‘एआय आणि डीएल’चे ‘भीष्मपितामह’
kutuhal artificial intelligence program for alphazero game
कुतूहल : अल्फागो’च्या पुढे…
loksatta kutuhal ancient chinese game of go
कुतूहल : गो मॅन गो
loksatta kutuhal deep blue computer beats world chess champion garry kasparov
कुतूहल : ‘डीप ब्लू’ला ‘कृत्रिम बुद्धी’ होती?
Loksatta kutuhal Artificial intelligence and chess
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिबळ
Loksatta kutuhal Geoffrey Hinton a pioneer of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते जेफ्री हिंटन
Loksatta kutuhal Challenges in Language Learning
कुतूहल: भाषाशिक्षणातील आव्हाने
kutuhal natural language processing using artificial intelligence to understand human language
कुतूहल : भाषा प्रक्रियेचे अंतरंग…
Conversations Between Human and Machines
कुतूहल : भाषापटू यंत्रांची करामत

भारतात जेलीडियम आणि सोलीएथापासून घनता आणणारे ‘अगार’ मिळविले जाते. अगारचा उपयोग प्रयोगशाळेत ऊती संवर्धन माध्यम तयार करण्यासाठी होतो. लाल सागरी शैवालाचा उपयोग सागराचा आम्लीकरण दर्शक म्हणूनही होऊ शकतो. लाल सागरी शैवालाचे परिस्थितिकी शास्त्राच्या अभ्यासातही खूप महत्त्व आहे. कारण हे शैवाल अन्नसाखळीसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरते. यांच्याकरवी ४० ते ६० टक्के जागतिक ऑक्सिजन निर्माण होतो. या ऑक्सिजनचा उपयोग सागरातील आणि जमिनीवरील जीवांसाठी होतो. हिरव्या, तपकिरी आणि लाल शैवालांत चिकट पदार्थ असल्याने या तीनही शैवालांपासून कागदावर सुंदर शुभेच्छापत्रे तयार करता येतात.

– डॉ. चंद्रकांत लट्टू

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org