कुतूहल: बहुपयोगी डांबर
पेट्रोलियम खनिज तेलाचे उध्र्वपातन केले जात असताना, एकेक उपयुक्त पदार्थ मिळविले जातात व शेवटी जो घनरूप चोथा उरतो, त्याला डांबर म्हणतात. रस्ते बांधणीसाठी वापरताना डांबरामध्ये केरोसिन मिसळले जाते किंवा त्याचे पाण्यात इमल्शन केले जाते. पाणी उडून गेले की त्या इमल्शनमधला डांबर रस्त्यावर थराच्या रूपाने पसरतो. विमानतळावरील धावपट्टय़ा तयार करण्यासाठी, कालवे बांधताना, घराची छपरे जलरोधक बनविण्यासाठी, विजेच्या केबल्स, िपट्रिंगची शाई तयार करणे इत्यादी कामासाठी डांबर उपयुक्त ठरते.
‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’ या मानद संस्थेच्या व्याख्येनुसार डांबर हा अस्फटिक घन किंवा जाडसर चिकट पदार्थ असून, तो खनिज तेलाचे शुद्धिकरण करून किंवा अन्य नसíगक पद्धतीने मिळविता येतो. तो काळ्या किंवा खाकी रंगाचा असतो. डांबर जलरोधक, चिकट, लवचीक व रासायनिकदृष्टय़ा उदासीन असा पदार्थ असून सौम्य आम्ल वा अल्कलीचा त्यावर परिणाम होत नाही. प्रयोगशाळेत त्याचा भेदन-बिंदू (पेनेट्रेशन पॉइंट) सोबतच त्याचा मृदू बिंदू (सॉफ्टिनग पॉइंट) देखील मोजला जातो. ज्या तापमानाला डांबर मृदू बनते व वाहू शकते ते तापमान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे ठरविले जाते. अर्थात, घनस्वरूपातील डांबराचे झटकन द्रवरूपात बदल होत नसतो, तर वाढत्या तापमानासोबत ते हळूहळू मृदू बनत जाते.
डांबर हे निसर्गात साठलेल्या रूपातदेखील मिळते ते ‘अस्पाल्टिक डांबर’ होय. हे ‘अस्पाल्टिक डांबर’ म्हणजे डांबर व काही खनिज घटकांचे मिश्रण असते.
डांबर हा मुख्यत: नॅफ्थेनिक आणि एरोमेटिक स्वरूपाच्या खनिज तेलापासून प्राप्त होत असतो. त्याच्या भेदन-बिंदूवरून त्याचे वर्गीकरण केले जाते. हा भेदनिबदू २५ अंश से. तापमानावर आणलेल्या डांबराच्या नमुन्यावर ठरविला जातो. विशिष्ट आकाराची सुई ५ सेकंदात थंड केलेल्या नमुन्यात किती अंतर घुसते, तो त्याचा भेदन-बिंदू होय. हे अंतर एकशतांश से.मी.च्या एककाने मोजले जाते. ८० ते १०० भेदन-बिंदूची मर्यादा असलेल्या डांबराचे वर्गीकरण ८०/१०० असे करतात. अशाप्रकारे त्याचे ६०/७०, ३०/४० असेही वर्ग आहेत.
प्रबोधन पर्व
काळाचा महिमा
‘परमेश्वराप्रमाणेंच काळ हा आद्यान्तरहित आहे आणि आदि व अन्त ह्य़ांनीं विरहित हा काळ असल्यामुळें परंपरेनें ह्य़ाच्याहि अंगांत पुष्कळ विलक्षण शक्तींचा समावेश झालेला आहे. परमेश्वर हें सगळ्यांचे मुख्य कारण आहे आणि काळ उपाधीभूत आहे. काळ हा जसा अनादि आणि अनंत आहे तसाच तो सर्व ठिकाणीं आणि सर्व वेळीं असतो. म्हणून जगांत आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी घडून आल्या त्या त्या सर्व काळानें पाहिल्या आहेत व ह्य़ापुढें ज्या ज्या गोष्टी घडून येणार असतील त्याहि सर्व काळाला पाहावयाला सांपडतील. अशा प्रकारचें काळाचें भव्य, उदात्त, गंभीर आणि अतक्र्य स्वरूप लक्षांत आणलें म्हणजे कांहीं कांहीं तत्त्ववेत्ते काळ हें निराळें द्रव्य न मानतां त्याचें परमेश्वराशीं तादात्म्य मानितात तें किती यथार्थ आहे, हें चांगलें लक्षांत येईल.’’ अशा प्रकारे शि. म. परांजपे काळाच्या लीला सांगत त्याचा महिमा पुढीलप्रमाणे वर्णितात –
‘वास्तविक पाहतां उत्पत्ति, स्थिति आणि लय या तिन्हीला हाच कारणीभूत आहे.. दूरदर्शी राजकारणी पुरुषांप्रमाणें यानें पुढें काय काय गोष्टी करावयाच्या तेंसुद्धां सर्व ठरवून टाकलें आहे. कोणतें निरुपयोगी म्हणून पाडून टाकायचें आणि कोणतें नवीन बांधावयाचें, कोणत्या भरभराट संपलेल्या शहराची जागा रानें लावण्यासाठीं मोकळी करून द्यावयाची आणि कोणत्या रानांतील जागा साफ करवून नवीन शहरें वसवावयाचीं, कोणत्या राजांना तक्तावरून खाली ओढावयाचें आणि कोणाला नेऊन तेथे बसवावयाचें, कोणत्या लोकांच्या गळ्यांत विजयश्रीकडून माळा घालावयाच्या आणि कोणाच्या पायांत गुलामगिरीच्या बेडय़ा अडकवावयाच्या, हें सर्व यानें कायम करून ठेविलें आहे. आणखी हजारों वर्षांनंतरच्याहि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील राष्ट्रांचा नकाशा यानें कुशल चिताऱ्याप्रमाणें सर्व रंगवून तयार केला आहे. हिरवा, पिवळा, तांबडा, निळा, पांढरा हे निरनिराळे रंग कोठें कोठें कसे भरावयाचे याचा त्यानें कधींच निकाल लावून टाकला आहे. अशा प्रकारची व्यापक कल्पना काळ हा शब्द उच्चारला म्हणजे मनांत येते, – आणि हाच काळ शब्दाचा मूळचा अर्थ.’’
मनमोराचा पिसारा
पाच सेकंदांत काय दिसतं?
आज एक छोटासा प्रयोग करायचा आहे. मुख्य म्हणजे ही परीक्षा नाही त्यामुळे यात पास/फेल असा निकाल लागणार नाहीये. आता सोबत दिलेल्या चित्राकडे फक्त पाच सेकंद पाहा, नजर लगेच दुसरीकडे वळवा आणि चित्रात काय दिसलं ते दोन-तीन वाक्यात सांगा. एकच अट, मनातल्या मनात बोलू नका.. मोठय़ाने बोला. मानलं पहिलं वाक्य सर्वात महत्त्वाचं आहे. ओके. मी थांबतो पाच सेकंद आणि नंतर तीन सेकंद.
दोन शक्यता आहेत.
१) तुम्हाला तीन मासे दिसले, ते मासे हे त्या चित्रातले सर्वात मुख्य प्राणी आहेत. तुम्ही वाक्य आधी उच्चारलंत? की
२) ही एक फिशटँक आहे, यात छोटे दगड, पाण वनस्पती, छोटे मासे, बुडबुडे आणि बेडूकदेखील आहे! असं म्हणालात? पुन्हा सांगतो, यात पास/ फेल नाही. तुमच्या वाक्यावरून तुमच्या मनोवृत्तीचा महत्त्वाचा कल लक्षात येतो. या अगदी साध्या प्रयोगातून तुम्ही व्यक्तित्त्ववादी की समाविष्टवादी आहात याची चुणूक दिसते. व्यक्तित्त्ववादी म्हणजे व्यक्तीकेंद्री आणि दुसरी वृत्ती कलेक्टिव्हिस्ट!
अर्थात पाच सेकंदांनंतर सर्वाना सर्वच दिसतं, तरीही एखादा छोटा मासा आणि बेडूक नजरेतून सुटतोच. म्हणून पाच सेकंदात काय दिसतं, ते महत्त्वाचं! हा प्रयोग अमेरिकेतील आणि पौर्वात्य (जपान) देशातील तरुणांवर केला तेव्हा अमेरिकन लोक अधिक व्यक्तित्त्ववादी, असल्यानं चित्रामधले मुख्य मासे त्यांना दिसले तर जपानी मंडळी सर्वसमावेशक (होलिस्टिक) होती.
म्हणजे अमेरिकेत अथवा काही व्यक्तींमध्ये जीवनातला प्रमुख ऊर्जा स्रोत नि कर्ताकरविता इंडिव्हिन्युअल अथवा व्यक्ती ठरते तर काही लोकांना सभोवतालचं वातावरण आणि व्यक्ती यांच्यामधली नातेसंबंध नि उलाढाल महत्त्वाची ठरते. व्यक्तित्ववादी समाजात एका व्यक्तीमध्ये समाज बदलण्याची ताकद आहे, असं मानलं जातं, अशा कर्तबगार व्यक्तींच्या कहाण्या लोकप्रिय होतात. आपण ठरवलं तर आपलं जीवन बदलू शकतो, अशी मूल्य रुजतात. समष्टीवादी समाजात एखाद्या व्यक्तीच्या कार्यामुळे समाज बदलत नसून, अनेक निरनिराळे घटक संयुक्तपणे समाज घडवितात अथवा बिघडवितात, अशी धारणा असते. जीवनाकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन, दोन्ही बरोबर..!
ल्ल डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
संदर्भ : द आर्ट ऑफ चूजिंग – शीना अय्यंगार.