मासे पकडण्यासाठी विविध जाळ्यांचा वापर करतात.
१. ट्रॉलजाळे : हे जाळे खास समुद्रातील तळालगतचे मासे पकडण्यासाठी बनवलेले आहे. कवचधारी मासेसुद्धा या जाळ्यात पकडता येतात. ट्रॉल जाळ्याचा आकार नरसाळ्यासारखा असतो. याच्या शेवटच्या भागाला इंग्रजीत कॉडएन्ड म्हणतात. या कॉडमधून जाळ्यात पकडलेले मासे गोळा करतात. मधल्या थरातील किंवा पृष्ठभागावरील मासेही या जाळ्याद्वारे पकडता येतात. ट्रॉलजाळे एक किंवा दोन बोटींच्या सहाय्याने वापरता येते.
२. पर्सनि जाळे : पर्सनि अतिशय विकसित जाळे असून त्याचा वापर थव्यामध्ये राहाणाऱ्या पृष्ठभागावरील मासे पकडण्यासाठी करतात. या जाळ्याच्या मासेमारी करण्याच्या पद्धतीने जगातील बरीचशी मासेमारी केली जाते. पारंपरिक पद्धतीने म्हणजे माशांचे रंग, पोत, उडय़ा मारण्याची पद्धत इत्यादींवरुन पृष्ठभागावरचे माशांचे थवे शोधले जातात. सोनार, इकोसाउंडर, टेलेसाउंडर इत्यादी उपकरणांचा वापर मासे पकडण्यासाठी करतात. मुख्य बोटीवरून एक छोटी बोट पाण्यात सोडतात. ती बोट माशांच्या थव्याला पर्ससारखा आकार तयार होईल असा वेढा देते व जाळ्याचा खालचा दोर ओढून जाळे खालच्या बाजूने बंद करतात. पर्ससारख्या आकारात पृष्ठभागावरील मासे अडकतात. त्यांना मुख्य बोटीवर ओढून घेतात.
३. गिलनेट : गिलनेट हे एक स्थिर स्वरूपाचे जाळे आहे. ते पाण्यात बुडत्या (सिंकर) आणि तरंगत्या (फ्लोट) यांच्या सहाय्याने स्थिर करतात. ते पाण्यात उभ्या भिंतीसारखे बसवतात. या जाळ्याद्वारे मासेमारीसाठी लागणारा खर्च कमी असल्यामुळे छोटय़ा मच्छिमारांमध्ये गिलनेट प्रसिद्ध आहे. हे जाळे पाण्याच्या पृष्ठभागावरील, मध्यभागावरील व तळाजवळील मासे पकडण्यासाठीही वापरतात.
मासेमारीसाठी ही तीनही जाळी मत्स्यव्यवसायात जास्तीतजास्त वापरतात. पावसाळ्यात १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत बहुतांश माशांच्या नसíगक प्रजननाची वेळ असते. म्हणून या कालावधीत मासेमारी पूर्णपणे बंद ठेवतात, जेणेकरून भविष्यात माशांचा तुटवडा भासणार नाही.
 विविध संशोधनांद्वारे जाळ्यांची क्षमता, बोटींची क्षमता वाढवून मासेमारी पद्धती अधिकाधिक विकसित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी.. – चांगुलपणा
देव ही गोष्ट कितीही रहस्यमय असली तरी त्याहून जगात तितकीच रहस्यमय गोष्ट अशी की, माणूस चांगला वागतो. चांगुलपणा राबवण्याचे कारण तरी काय? स्वत:चे बघावे हेच खरे.
त्याविषयी कांट नावाचा तत्त्वज्ञानी म्हणाला होता, आपले चांगले वागणे हा बुद्धीचा प्रांत नव्हे. आपण जर सतत स्वार्थी वागलो तर आणि आपल्यासारखेच जर इतरही तसेच वागू लागले, तर समाज विस्कळीत होईल या उत्स्फूर्त भावनेने मन कचरते आणि शक्यतोवर चांगले वागणे घडते. तो आणखी एक मोठे पाऊल टाकतो आणि म्हणतो, मी चांगला वागलो तर मला स्वर्ग मिळेल असा विचार करणे फोल आहे. अनेक मानवी कल्पनांसारखी स्वर्ग ही एक फक्त कल्पनाच असते असे जाणणे आणि चांगुलपणाचा आपल्यापुरता स्वर्ग इथे निर्माण करणे हेच आपले ईप्सित असले पाहिजे.
 त्याच्या आधीचा स्पिनोझा नावाचा तत्त्वज्ञानी म्हणाला होता- हे विश्व हा एकच पदार्थ आहे. त्याचे तुकडे पाडणे म्हणजे स्वार्थीपणे जगणे आणि हे असे जगणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. स्पिनोझा  होता ज्यू आणि त्याला त्याच्या धर्मबांधवांनी आणि गुरूंनी बहिष्कृत केला होता. कांटचे तेच थोडय़ाफार फरकाने होते. हा कधी कोठल्या प्रार्थना सभेला गेल्याचे किंवा मनोभावे भक्ती केल्याचे दाखले नाहीत.
रसेल नावाच्या संपूर्णपणे निरीश्वरवादी आणि गणिती तत्त्ववेत्त्याने, तर्काने सगळे प्रश्न सुटतात असे माझे म्हणणे नाही, परंतु तर्काच्या पलीकडे काही तरी अद्भुत आहे आणि ते अद्भुत आपले प्रश्न सोडवू शकेल हे मला पटत नाही असे विधान केले खरे आणि शिवाय अशीही कबुली दिली की, सद्गुणांना तर्काच्या निकषांवरून तपासणे अशक्यप्राय आहे. झेनो नावाचा ग्रीक तत्त्वज्ञानी म्हणत असे, जो आपली शारीरिक, मानसिक भूक जाणतो आणि त्या भुका भागवताना निसर्गाचा समतोल न बिघडवता सुखदु:ख, द्वेषाच्या पलीकडे जाऊन स्वानंदी जीवन जगतो तो नीतिमान असतो.
झेनोचे तत्त्वज्ञान Stoicism या नावाने ओळखले जाते आणि या तत्त्वज्ञानावर भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे असे समजले जाते. र३्रू आणि स्थितप्रज्ञ हे शब्द कानाला सारखेच भासतात. एवढेच नव्हे तर ज्याची प्रज्ञा स्थित/स्थिर (Steady) आहे असा जो अर्थ त्या शब्दातून निघतो त्याबद्दल आणि एकूणच ज्ञानेश्वर याबाबतीत काय म्हणतात याबद्दल पुढच्या लेखांमध्ये.
 परंतु तत्पूर्वी याआधीच्या भयानक अवघड प्रश्नांची उत्तरे तर मी दिली नाहीतच, पण तुम्हालाही आणखी गोंधळात पाडले याची कबुली देतो. अर्थात गोंधळ इतरांशी वाटून घेतल्याने तो कमी होतो अशातला भाग नाही..
 हा तत्त्वज्ञानाचा गोंधळ इतर गोंधळापेक्षा जरा सरस असतो एवढेच.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Net for fishing
First published on: 18-09-2013 at 01:01 IST