वनस्पती आणि हिरवा रंग या दोन बाबी एकमेकांना फार जवळून जोडलेल्या आहेत. बहुतेक सर्व वनस्पतींची पाने हिरवी असतात. कोवळी पाने जरी लालसर दिसत असली तरी कालांतराने ती हिरवी दिसू लागतात. वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग कशामुळे येतो या प्रश्नाने अनेक शास्त्रज्ञांना पछाडले. कित्येक वर्षांच्या प्रयत्नानंतर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले. त्यासाठी हे द्रव्य प्रथम वेगळे करणे आवशयक होते. १८१७ मध्ये जोसेफ बिनेम कॅवेंटू ( Joseph Bienaimé  Caventou)) आणि पिएर जोसेफ पेलेतिए (Pierre- Joseph Pelletier) या दोन फ्रेंच शास्त्रज्ञांनी वनस्पतींच्या पानांतील हरितद्रव्य वेगळे करण्यात यश मिळविले.

वनस्पतींच्या पानांमध्ये असलेले हरितद्रव्य हे रसायन आपल्यालादेखील सहजपणे वेगळे मिळविता येते. त्यासाठी इथाईल अल्कोहोल या कार्बनी रसायनाची गरज भासते. जर अल्कोहोल उपलब्ध नसेल तर आपण स्वयंचलित वाहनात इंधन म्हणून जे पेट्रोल घालतो तेदेखील वापरले तरी चालते. हिरवी पाने घेऊन त्यांचे बारीक तुकडे करून घ्यावे. हे तुकडे खलबत्त्यात चांगले ठेचून त्याचा लगदा तयार कारायचा. हा लगदा नंतर अल्कोहोल किंवा पेट्रोल असलेल्या पात्रात टाकावा. मिश्रण चांगले हलवावे आणि ठेवून द्यावे. थोडय़ाच वेळात पानातील रंग द्रवात उतरतो आणि द्रव हिरवा दिसू लागतो. हिरवी पाने घेतली असतील तर द्रवाचा रंग गर्द हिरवा दिसतो. याऐवजी जर पिवळसर पाने घेतली तर द्रवाचा रंग फिकट हिरवा दिसतो. जर आपण लालसर पाने घेतली तर द्रवात हिरवा आणि लाल असे दोन थर दिसतात.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

हरितद्रव्य हे एक गुंतागुंतीचे कार्बनी रसायन आहे. त्याची रेणूरचना इतकी किचकट आहे की ती समजायला विसावे शतक उजाडावे लागले. १९४० मध्ये हॅन्स फिशर (Hans Fisher) नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने हरितद्रव्याची रेणूरचना विशद केली.  C55H70O6N4Mg   हे हरितद्रव्याचे रेणूसूत्र आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की या रसायनात कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि मॅग्नेशिअम ही मूलद्रव्ये असतात. या रसायनात बरीच विविधता आढळते. सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या रसायनांचे रचनासूत्र चित्रात दाखविले आहे. हे एक कार्बनी रसायन असून कार्बनच्या अनेक साखळय़ा आपल्याला या रेणूरचनेत पाहायला मिळतात. त्यांना कार्बनी रसायनशास्त्रात ‘पिरीनची साखळी’ असे म्हणतात. या साखळीत कार्बन आणि ऑक्सिजन नायट्रोजनला जोडलेले असतात. मॅग्नेशिअमचा अणू या साखळीच्या मध्यभागी असतो. म्हणूनच नवीन हरितद्रव्य तयार करण्यासाठी वनस्पतींना मॅग्नेशिअम धातूची गरज असते. – डॉ. सुधाकर आगरकर मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org