इंटेक्सने २.० चॅनलने त्याची ब्लूटूथ स्पीकर सिस्टिम बाजारात आणली असून आयटी १२००१ एसयूएफ बीटी आणि आयटी १२००२ एसयूएफ बीटी अशा दोन रेंजमध्ये ती उपलब्ध आहे. यामध्ये यूएसबी पोर्ट, एसडी कार्ड स्लॉट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि बिल्ट इन एफएम टय़ुनरची सोय उपलब्ध आहे. इतकंच नाही तर ऑक्स ऑडिओ इनपुट डीव्हीडी, पीसी, एलसीडी टीव्हीसोबत कनेक्ट करता येतो. या सोयीमुळे तुम्ही सहजरीत्या संगीताचा आस्वाद घेऊ शकता. आयटी १२००१ एसयूएफ बीटी आणि आयटी १२००२ एसयूएफ बीटी अनुक्रमे ९२०० आणि ९००० या किमतीत बाजारात उपलब्ध आहे.

वैशिष्टय़े :

प्रमुख आकर्षण : आयटी १२००१ एसयूएफ बीटी, आयटी १२००२ एसयूएफ बीटी
आउटपुट पॉवर : ५० डब्ल्यू + ५० डब्ल्यू
फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स : मेन युनिट : ४० हर्ट्ज – २० किलोहर्ट्ज
इनपुट आउटपुट जॅक : आरसीए जॅक
एफएम फ्रिक्वेन्सी : ८८ मेगाहर्ट्ज ते १०८ मेगाहर्ट्ज
पॉवर सप्लाय : एसी २०० वोल्ट – २४० वोल्ट / ५०-६० हर्ट्ज
स्पीकर साइज : मुख्य युनिट – २०. ३२ सेंमी, मिड स्पीकर – १०.१६ सेंमी, ट्विटर – २.५ सेंमी
बीटी रेंज : ७-८ मीटर्स

ओप्पो एफ वन प्लस

ओप्पो मोबाइल्सने द सेल्फी एक्स्पर्ट ओप्पो एफ वन प्लस हा मोबाइल नुकताच भारतात लाँच केला आहे. सेल्फी एक्स्पर्ट ओप्पो एफ वन प्लस हे सेल्फी एक्स्पर्ट एफ वनचे पुढील व्हर्जन आहे. कोणतेही मेटल युनिबॉडी असलेले फोर जी डिव्हाइस पॉवरफुल ऑक्टा कोअर प्रोसेसरसह वेगाने चालतात. फ्रंट फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सॉर हे या फोनमध्ये असलेलं प्रमुख आकर्षण. यामुळे दोन सेकंदांत फिंगरप्रिंट ओळखून हा फोन अनलॉक करता येतो. १६ मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेऱ्यामुळे मिळेल त्या प्रकाशात फोटो अगदी स्पष्ट येऊ शकतात. यामधील सेल्फी पॅनरोमा फीचर, ब्युटीफाय ४.० आणि फ्रंट फेसिंग स्क्रीन फ्लॅश या सुविधांमुळे ग्राहकाला त्याचा पहिलाच फोटो उत्तम मिळू शकतो. व्हीओओसी फ्लॅश चार्ज हे ओप्पोचे पेटंटही आहे. द सेल्फी एक्स्पर्ट ओप्पो एफ वन प्लसची किंमत रु. २६,९०० इतकी आहे.

वैशिष्टय़े :

५.५ इंच स्क्रीन.
१६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा एफ/२.० अ‍ॅपरचर आणि आयएसओसीईएलएल सेन्सर.
कलर ओएस ३.० या नव्या सिस्टिमसह फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी रॅम.
सेल्फी पॅनरोमा फीचर, ब्युटीफाय ४.० आणि फ्रंट फेसिंग स्क्रीन फ्लॅश.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com