News Flash

ग्रामसेवकाची वेतनवाढ रोखली

निष्काळजी व हयगय केल्याचे आढळून आल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे

मुदतबाह्य सॅनिटायजर वाटपप्रकरणी कारवाई

पालघर: जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे खुर्द येथील मुदतबा’ सॅनिटायजर वाटप केल्याप्रकरणी ग्रामसेवक गणेश एकल यांनी कामात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांची वेतनवाढ रोखली आहे. या प्रकारच्या चौकशीनंतर गटविकास अधिकारी यांनी ही शिक्षा दिली आहे.

या ग्रामसेवकाने ग्रामपंचायत क्षेत्रासाठी सॅनिटायझर खरेदी करताना मालाची वैधता न तपासणे, वाटपाबाबत अतिघाई करणे, साठ्याची नोंदवहीत नोंद न घेणे, ई टेंडरिंग न करता कोटेशन पद्धतीने खरेदी करणे असा बेजबाबदारपणा दाखविला असल्याचे चौकशीत समोर आले होते. चौकशी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकावर ठपका ठेवत त्याने सॅनिटायझर खरेदी प्रक्रिया राबविताना बेजबाबदारपणा, निष्काळजी व हयगय केल्याचे आढळून आल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे तसेच गणेश एकल यांनी कामात कसूर केल्याचे नमूद आहे. तसेच, ग्रामसेवकाने दुर्लक्ष केल्यामुळे जनतेच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक एकल यांना जिल्हा परिषदेच्या सेवा अधिनियमानुसार दोषी ठरवून त्यांची एक वर्षाची वेतनवाढ थांबविण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:23 am

Web Title: gram sevak pay hike stopped expired sanitizer allocation case akp 94
Next Stories
1 पालघर तालुक्यात एक लाख जणांच्या लसीकरणाचा टप्पा पार
2 दत्तक योजनेत वृक्षांना बहर
3 वैतरणा पुलाजवळ रेती उत्खनन करणाऱ्या बोटीला ग्रामस्थांनी पकडले
Just Now!
X