भूमी अभिलेख अधीक्षकांची ग्रामपंचायतीला सूचना

डहाणू : महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील मौजे-वेवजी व गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील मौजे सोलसुंबा येथील हद्दीच्या भागात अतिक्रमण वाढून महाराष्ट्र व गुजरात राज्यात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे गावांची सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामपंचायतीला ठराव सादर करण्याचे आदेश अधीक्षक, भूमी अभिलेख यांनी वेवजी  ग्रामपंचायतीला दिले आहेत.

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतींच्या हद्दीवरील महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे. वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं. २०४ चा भूखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नं. १७३ या दोन भूखंडांवर दोन राज्यांची सीमा आहे. हद्द निश्चित नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत. गूगल नकाशात महाराष्ट्र सीमेवरील वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, अच्छाड, संभा ही गावे गुजरात राज्यात दाखवण्यात आल्याने प्रशासनाकडून चूक दुरुस्त करण्यासाठी  पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या सीमेलगत वेवजी येथे गुजरातमधील नागरिकांनी घुसखोरी केल्याने महाराष्ट्र-गुजरात सीमा वाद उफाळून आला.  याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २८ ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर हद्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याचे दिसून येत आहे. पालघर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्य यांच्यातील सीमेची हद्द निशाणी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १३३ नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सीमेचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.

uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र  राज्याची सीमा निश्चित करण्यासाठी मौजे वेवजी गावातील  ज्या सर्वे क्रमांकाची हद्द निश्चित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वे नंबरचे ७/१२ उतारे व नोटीस बजावण्याकामी खातेदारांची नावे व पत्ते मागवण्याचे काम सुरू आहे.

 – शांताराम अहिरे, उपअधीक्षक भूमी अभिलेख