प्रकल्प परिसरातील रहिवासी पाच दिवसांपासून अंधारात

कासा : दापचरी दुग्धप्रकल्पअधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे दापचरी दुग्धप्रकल्पातील रहिवाशी आणि कृषिक्षेत्र धारकांना  पाच दिवसापासून  अंधारात राहावे लागले आहे. ५० लाख १६ हजार ६०६  रुपयेप्रकल्पाचे वीज देयक थकीत असल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. 

 कोरोनाच्या काळात प्रकल्पाची एकूण वीज थकबाकी ९० लाखाच्या वर होती. त्यामुळे वीज वितरण ने प्रकल्पाचा विद्युत पुरवठा खंडित करताच प्रकल्पाकडून महावितरण कंपनीला १३ लाख व त्यानंतर पुन्हा ४० लाख रुपये वीज थकबाकी पोटी भरल्यानंतर प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला होता. उर्वरित थकबाकी अधिकाऱ्यांनी निधी प्राप्त होताच रक्कम भरण्याचे आश्वासन देखील दिले होते. पण मुंबईत बसून दापचरी दुग्धप्रकल्पाचा कारभार चालविणाऱ्याप्रकल्प अधिकाऱ्यांनी वीज देयक  भरण्याची कार्यवाही न केल्याने महावितरणनेप्रकल्पाचा वीज पुरवठा पुन्हा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे कुझ्रे धरण परिसरासह कृषिक्षेत्र धारक शेतकरी आणि संपूर्ण दुग्धप्रकल्पअंधारात गेले आहे.

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीप्रकल्प अधिकाऱ्यांना बिला बाबत पत्र पाठवून चोवीस तासांत वीज बिल भरण्यास संगीलते होते. मात्र अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने नाइलाजास्तवप्रकल्पाचा वीज खंडित करण्यात आला.

वीज थकबाकी असताना व वीज वितरण कंपनीचे अधिकारी वारंवार स्मरण करत असताना मुंबईत बसून दापचारी दुग्धप्रकल्पाचा कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी गंभीरतेने न घेतल्याने पुन्हा दापचरी दुग्धप्रकल्पाची वीज गेल्या पाच दिवसापासून  खंडित झाल्याने रहिवाशांना पुन्हाअंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे दापचरी कृषी क्षेत्रधारकामधून संताप व्यक्त होत आहे .    

वीज बिल थकीत असल्याने दापचरी प्रकल्पाचा वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. त्यामुळे दापचरी प्रकल्पातील कुझ्रे धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वीज पूवरठा होत नसल्याने रात्रीच्या वेळी धरण पूर्ण अंधारात असते.तसेच वीजपुरवठा नसल्याने धरण परिसरातील सुरक्षा कॅमेरे सुद्धा बंद पडले आहेत.

प्रकल्पाची वीज थकबाकी ५० लाख १६ हजारच्या घरात असून याबाबत उच्चस्तरावर पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून निधी प्राप्त होताच रक्कम वीज वितरण कडे जमा करण्यात येईल. यापूर्वी दोन वेळेला निधी प्राप्त होताच भरण्यात आलेले आहेत.

घनश्याम चौधरी (सहायक प्रकल्पअधिकारी )