ग्रामपंचायत, सामाजिक संस्थांचा विरोध

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मैदानासाठी राखीव ठेवलेल्या सुमारे १७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या खुल्या जागेचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने औद्योगिक भूखंडात (प्लॉट) रूपांतर केले आहे. या  भूखंडाची एका उद्योगाला विक्री केली आहे. एमआयडीसीच्या या कृतीला ग्रामपंचायत तसेच सामाजिक संस्थांनी विरोध केला आहे. सन २०१० दरम्यान एमआयडीसीच्या प्लॉट क्रमांक ओएस- ४७/२ मधील ५१ हजार ३२९  चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या खुल्या जागेतील ३४ हजार ३१९ चौरस मीटर इतकी जागा डी-डेकोर नामक कंपनीला देण्यात येऊन उर्वरित सुमारे १७ हजार चौरस मीटर जागा मैदानासाठी राखीव ठेवण्यात आली होती. २०१५ च्या सुमारास या मैदानाच्या जागेचे औद्याोगिक भूखंडात रूपांतर करून एका उद्योग समूहाला हा भूखंड विक्री करण्याचा एमआयडीसीने प्रयत्न  केला होता.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी

जनआंदोलनानंतर ही जागा मैदानासाठी राखीव ठेवण्याचे उद्योग मंत्र्यांनी जाहीर केले  होते. या मैदानाचे देखभाल खैरेपाडा ग्रामपंचायत करीत असून लायन्स क्लब ऑफ तारापूर, तर्फे या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. सद्यस्थितीत बोईसर व परिसरातील ग्रामपंचायतीचा कचरा या ठिकाणी एकत्रित केला जात आहे. एमआयडीसीने या मैदानासाठी वापरण्यात येणाऱ्या खुल्या जागेचे औद्योगिक भूखंडात रूपांतर करून पुन्हा एका उद्योग समूहाला त्याची विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता एमआयडीसीच्या खुल्या जागेच्या आरक्षणाची टक्केवारी अबाधित ठेवून उर्वरित जागा औद्योगिक वापरासाठी रूपांतरित केल्याची माहिती त्यांनी दिली. या संबंधित  भूखंडाची विक्री एका उद्योग समूहाला करण्यात आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. या प्रकरणात उद्योगसमूहाने एमआयडीसीकडे पैसे जमा केले असले तरी या  भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा अजूनही संबंधित उद्योगाला देण्यात आला नसल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ सांगितले.

आंदोलनाचा इशारा

पंचक्रोशीतील खेळाडूंसाठी हे एकमेव क्रीडांगण असून याची विक्री करू नये म्हणून सिटीझन फोरम बोईसर, खैरापडा ग्रामपंचायत व इतर सामाजिक संस्थांनी भूमिका घेतली असून एमआयडीसीच्या या कृतीचा विरोध केला आहे. एमआयडीसीनी खुल्या जागेसाठी आरक्षित भूखंडाचा निर्णय स्थगित न केल्यास या निर्णयाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक संस्थांनी दिला आहे.