scorecardresearch

खडकोलीतील उत्खननास बंदी

पालघर तालुक्यातील खडकोली या गावातील गौण खनिज उत्खननास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.

पालघर जिल्हा प्रशासनाचे आदेश

पालघर : पालघर तालुक्यातील खडकोली या गावातील गौण खनिज उत्खननास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. अनेक स्तरांवर तक्रारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. चुकीच्या पद्धतीने परवानगी घेऊन अवास्तव गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचा आरोप खडकोली गावातील ग्रामस्थांनी केले होते. उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे संपूर्ण गावाला हादरे बसत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.  उत्खनन करतेवेळी केल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा अभाव होता. उत्खननात पाणी आडवा पाणी जिरवाचा बंधाराही जमीनदोस्त करण्यात आला. नैसर्गिक नाला या उत्खननामध्ये गायब झाला आहे. उत्खननाच्या ठिकाणी अस्तित्वात असलेली विहीरही जमीनदोस्त झाली आहे.  हे बेकायदा उत्खनन तातडीने बंद करण्याची मागणी खडकोली गावातील ग्रामस्थांनी विविध स्तरांवर पत्रव्यवहार करून केली होती.  ना हरकत दाखल्यासाठी घेतलेला ठराव त्यानंतर झालेल्या ग्रामसभेत रद्द केलेला आहे .आमदार राजेश पाटील, विविध प्रशासकीय यंत्रणा यांनी एकत्र येत बुधवारी खदानीवर पाहणी केली. या वेळी आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे व ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार पाटील यांनी संबंधित यंत्रणांना ग्रामस्थांच्या समस्याविषयी धारेवर धरले. त्यानंतर या खदानीसाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सुनील शिंदे यांनी दिली. 

नागरिकांचे आलेले निवेदन व ना हरकत दाखल्याचा दुसरा ठराव लक्षात घेत खदानीला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसाठी तो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे.

– डॉ. किरण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी,पालघर

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Excavation banned order district administration ysh

ताज्या बातम्या