बोईसर : पालघर तालुक्यातील तारापुर जवळील कुडण येथे एका सात वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिलवासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर तालुक्यातील तारापुर जवळील कुडण येथे आपल्या कुटुंबियासोबत राहणारा प्रेम जितेंद्र पाटील (७) हा मुलगा मंगळवारी पहाटे सात वाजता दाट धुके असताना आपल्या घरापासून जवळच असलेल्या किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी गेला असताना त्याच्यावर अचानक एका प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याचा डोक्याला आणि चेहर्‍याला चावा घेण्याच्या आणि ओरबडल्याच्या गंभीर जखमा झाल्या आहेत. बिबट्याने हल्ला केल्यानंतर मुलाने जोरात आरडाओरड केल्याने जवळचे नागरीक धावून आले, तो पर्यंत दाट धुक्याचा फायदा घेत तो प्राणी पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रेम पाटील या मुलाला उपचारासाठी सिलावासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांची अवस्था दयनीय

shocking incident in Wardha bullets fired on cousin
वर्धेत थरकाप उडवणारी घटना, आतेभावावर गोळया झाडल्या
Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल

पालकांना प्रथम हा हल्ला कुत्रा किंवा अन्य वन्य प्राण्याने केल्याची शक्यता वाटल्याने त्याबाबत त्यांनी कोणाकडेही वाचता केली नाही. मात्र त्यादिवशी तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची पुष्टी मिळाल्यानंतर याबाबत वनविभागाला कळवण्यात आले. या लहान मुलावर झालेल्या जखमां चा अभ्यास करून हा हल्ला बिबट्याने केला असल्याची शक्यता उपचार करणारे डॉक्टर व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना समजल्यावर डहाणू वनविभाग, बोईसर वनपरीक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, डहाणूचे वन्यजीव बचाव पथकाचे स्वयंसेवक आणि तारापूर पोलिसांनी बिबट्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली.

हेही वाचा : पालघर : अमृत सरोवर योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७९ तलावांच्या खोलीत वाढ व सुशोभीकरण

चिंचणी व तारापूर परीसरात मागील चार-पाच महीन्यापासून बिबट्याचा वावर असून त्याने अनेक वेळा परीसरातील पाळीव कोंबड्या, कुत्रे, मांजरी आणि शेळ्या यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे. मात्र लहान मुलावर हल्ला करण्याची घटना प्रथमच घडली असून यामुळे परीसरातील लहान मुले आणि नागरीक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.