पालघर : पालघर तालुक्यातील माहीम या गावी पिसाळलेल्या श्वानाने दोन व्यक्तींवर हल्ला केल्याची घटना रविवारी घडली असताना उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना सोमवारी पुन्हा बोलविण्यात आले. रुग्णाच्या पायावर झालेली दंशामुळेची जखम प्रत्यक्ष न पाहता त्यांना त्यावरील उपचार लस उपलब्ध नसल्याचे सांगत सेलवास अथवा मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. पालघर शल्य चिकित्सक यांच्याकडे ही लस उपलब्ध असताना या रुग्णाला ठाणे सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले. यामुळे पालघर जिल्ह्यातील शासकीय आरोग्यवस्थेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

माहीम शिक्षण संस्थेचे एक ज्येष्ठ पदाधिकारी यांना पायाच्या पोटरीवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. पायावर असलेल्या पॅन्टमुळे या हल्ल्याची तीव्रता कमी जाणवली तरी देखील त्यांच्या पायाच्या पोटरीवर श्वानाचे पाच दातांचे दंश उमटले. माहीम येथील खाजगी डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

Violent Incident civil hospital thane, Patient s Relatives Attack Staff, civil Hospital Thane, Patient died at civil Hospital Thane, thane civil hospital staff and doctors protest, thane civil hospital, thane news, thane civil hospital news, thane news,
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

हेही वाचा : पालघर : जिल्ह्यातील रेल्वे भुयारी मार्गाचे आराखडे ठरले अपयशी

गेल्या रविवार (२६ नोव्हेंबर रोजी) त्यांनी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात गेले असता वैद्यकीय अधिकारी नसल्याचे सांगून कामावर असलेल्या परिचारिकेने सोमवारी येण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे सोमवारी हे गृहस्थ पुन्हा पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात गेले असता कामावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे जखम तपासण्याची तसदी न घेता थेट यावरील उपचार लस उपलब्ध नसल्याचे सांगून सेलवास, गुजरात किंवा मुंबई, ठाणे येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. अखेर या व्यक्तीने ठाणे येथे जाऊन रेबीज ईम्युनोग्लोबुलीन घेतली.

या कुत्र्याने वागुळसार, हरणवाडी परिसरात राहणाऱ्या अन्य एका तरुणाला दंश केल्याने मोठ्या स्वरूपाची जखम झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर स्थानिक पातळीवर मिळणारे अँटि रेबीज लस देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात पालघरची शल्य चिकित्सक डॉ. संजय बोदडे यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या कार्यालयात ईम्युनोग्लोबुलीन लसीच्या दोन मात्रा उपलब्ध असल्याचे सांगून त्या दिवशी कामावर असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या समन्वयाचा अभाव राहिल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले. आगामी काळात या लसीची आवश्यक प्रमाणात खरेदी करून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे ही लस उपलब्ध राहील यासाठी व्यवस्था करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : बोईसर : बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीर जखमी

गेल्यावर्षी माहीम गावात पिसाळलेल्या अन्य कुत्र्याने सहा- सात व्यक्तींचा चावा घेतल्याची घटना घडली असता सर्व बाधितांना मुंबई ठाणे येथे जाऊन प्रतिबंधात्मक लस घ्यावी लागली होती. हा विषय विविध स्तरांवर गाजल्यानंतर जिल्हा परिषदेने याबाबत उपाययोजना आखण्याचे ठरले होते. या चर्चेअंती किनारपट्टीच्या गावांमध्ये तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठिकाणी श्वानांचे निर्बिजीकरण करून ईम्युनोग्लोबुलीन लस मात्रा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्याचे योजिले होते. श्वान निर्बिजीकरण करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून हाती घेण्यात येत असला तरीही ईम्युनोग्लोबुलीन लस देताना रुग्णांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता पाहता या प्रस्तावाला वरिष्ठ वैद्यकीय विभागाकडून तांत्रिक मान्यता मिळाली नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी दिली. त्यामुळे श्वान दंश गंभीर असल्यास अशा रुग्णांना ग्रामीण रुग्णालय अथवा उपजिल्हा रुग्णालयाकडे पुढील उपचारासाठी पाठवण्याची पद्धत अवलंबली जात असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : पालघर : अमृत सरोवर योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७९ तलावांच्या खोलीत वाढ व सुशोभीकरण

ईम्युनोग्लोबुलीन लस कुणाला देणे आवश्यक असते

श्वान दंश झाल्यानंतर त्याचे वर्गीकरण करणे आवश्यक असून नागरिकांच्या चेहऱ्याला, मणक्याजवळील भागाला श्वानाने दंश केला असल्यास, दंशामध्ये मोठ्या प्रमाणात मासाचा लचका निघाला असल्यास अथवा त्या श्वानाने वेगवेगळ्या व्यक्ती अथवा जनावरांवर अशाच प्रकारे हल्ला केला असल्यास किंवा श्वानाच्या डोक्यात किंवा अंगावर वेगवेगळ्या प्रकारची जखम असल्यास अशा पिसाळलेल्या श्वानाच्या हल्ल्यामध्ये पीडित व्यक्तीला ईम्युनोग्लोबुलीन लस देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दंश केल्यानंतर काही दिवसात त्या श्वानाचा मृत्यू झाल्यास बाधित रुग्णाला ही लस देण्यात येते, मात्र दंश केलेल्या ठिकाणाचा अभ्यास करून त्याची वर्गीकरण करणे पुढील उपचारासाठी आवश्यक असताना पुरेशा प्रमाणात प्रशिक्षण नसणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सरसकट ईम्युनोग्लोबुलीन लस घेण्याची बाधित व्यक्तींना सल्ला दिला जातो. त्यामुळे भीतीपोटी ही लस घेण्यासाठी बाधितांची धडपड व धावपळ सुरू होताना दिसून येते.