जव्हार, मोखाडय़ाची वीजसमस्या कायम

सद्य:स्थितीत आशागड, गंजाड, सूर्यानगर येथे ३३ केव्हीच्या उपकेंद्र आहे.

बांधून तयार असलेले वीज उपकेंद्र दीड वर्षांपासून कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत

विजय राऊत
कासा :  राज्य विद्युत महामंडळाने दीड वर्षांंपूर्वी जव्हार येथे १३२ केव्ही क्षमतेचे वीजपुरवठा उपकेंद्राचे काम कोटय़वधी रुपये खर्च करून पूर्ण केले आहे, परंतु ते कार्यान्वित न झाल्यामुळे जव्हार, मोखाडय़ातील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या ही कायम राहिली आहे. तालुक्यातील सुमारे १६४ गावांतील वीजग्राहकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सद्य:स्थितीत आशागड, गंजाड, सूर्यानगर येथे ३३ केव्हीच्या उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्रावरून डहाणू, जव्हार, मोखाडा तालुक्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. तर जव्हार आणि मोखाडा येथे २२ केव्हीचे उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रांना डहाणू येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्रातून मुख्य वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. ही मुख्य वीजवाहिनी ४० ते ४५ वर्षे जुनी आहे. त्यामुळे पावसाळ्यात वादळी वाऱ्याच्या पावसात वीजवाहिनीच्या तारा तुटतात, वीजवाहिनीचे खांब पडतात. त्यामुळे गंजाड, सूर्यानगर, जव्हार, मोखाडा या सर्व उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित होतो व रात्री वीज खंडित झाल्यास हा सर्व भाग अंधारात जातो. या समस्येतून वीजग्राहकांची सुटका व्हावी, तसेच जुन्या वीजवाहिनीत बिघाड झाला तरी जव्हार मोखाडा येथील वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महाराष्ट्र वीज महामंडळाने दीड वर्षांपूर्वी जव्हार येथे नवीन १३२ केव्ही वीजपुरवठा क्षमतेच्या उपकेंद्र उभारण्यात आले आहे. परंतु या उपकेंद्राला वीज पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ८० किमीच्या वीजवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने हे उपकेंद्र कार्यान्वित झालेले नाही. जव्हार येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्र पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील १६४ गावांना या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणार आहे. तसेच डहाणू येथून आशागड, गंजाड, सूर्यानगर या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत बिघाड झाला तर जव्हारच्या वीजपुरवठा उपकेंद्रातून वीजपुरवठा करता येणार आहे. त्यामुळे जव्हार येथील वीजपुरवठा उपकेंद्र कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरी सदरील वीजपुरवठा उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी वीजग्राहक करत आहेत. याबाबत पालघर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गेल्यावर्षी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू म्हणून आश्वासन दिले होते, याबाबत त्यांच्याशी वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

जव्हार येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्र पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील १६४ गावांना या उपकेंद्रातुन वीज पूवरठा होणार आहे.तसेच डहाणू येथून आशागड, गंजाड, सुर्यानगर या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीत बिघाड झाला तर जव्हारच्या वीजपुरवठा उपकेंद्रातून वीजपुरवठा करता येणार आहे. त्यामुळे जव्हार येथील वीजपुरवठा उपकेंद्र कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरी सदरील वीजपुरवठा उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी वीजग्राहक करत आहेत.याबाबत पालघर जिल्ह्यचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गेल्यावर्षी  लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू म्हणून आश्वासन दिले होते, याबाबत त्यांच्याशी वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

वनविभागाच्या परवानगीला वेळ

जव्हार येथील उपकेंद्राला ज्या वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा होणार आहे. त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. सदर वीजवाहिनीचा ३७ किमी भाग हा वनविभागाच्या जमिनीवरून जाणार आहे. त्यामुळे या भागांत काम करण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये निवेदन दिलेले आहे. वनविभागाच्या परवानग्या घेण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने या वाहिनीचे काम संथगतीने सुरू असल्याचे समजते.

जव्हार १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यासाठी ८० किमी वीजवाहिनीचे काम सुरू आहे. वीजवाहिनीचे ३७ किमी भाग हा वनविभागाच्या हद्दीतून जात आहे. त्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना डिसेंबर २०१९ मध्ये निवेदन दिलेले आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी हे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून परवानगी देणार आहेत.

-विजय आवरे, मुख्य अभियंता, महापारेषण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jawhar mokhada power problem persists ssh