महाराष्ट्र-गुजरात सीमावाद मिटवण्यासाठी ३ व ४ मार्च रोजी संयुक्त मोजणी

नितीन बोंबाडे

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?

डहाणू : बहुचर्चित महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा प्रश्न शासन पातळीवर  संयुक्तपणे सोडवण्याच्या हालचाली सुरू झाल्या  आहेत. त्या अंतर्गत   ३ आणि ४ मार्च रोजी संयुक्त मोजणी करण्यात येणार असून त्याद्वारे हा वाद सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे. त्यानुसार  दोन्ही राज्यातील सीमेवरील जिल्हा अधीक्षकांसह, तहसीलदार, सरपंच आदींना यावेळी उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.  गुजरात राज्यातील  उंबरगाव येथील सोलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत दीड किलोमीटर आत घुसखोरी केली आहे. त्यामुळे  महाराष्ट्र व गुजरात सीमावाद  चिघळला आहे. वारंवार सीमा निश्चित करण्याच्या हालचाली होऊनही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून  संयुक्त मोजणी करणे हा त्याचाच एक भाग आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १३३ नुसार  मौजे वेवजी ता. तलासरी व मौजे-सोलसुंभा,ता. उंबरगांव येथील महाराष्ट्र व गुजरात राज्याची सीमाहद्द निश्चित करून सीमावाद मिटवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार आहे.  ३ ते ४ मार्च या दोन दिवसांच्या कालावधीत   मौजे वेवजी येथील महाराष्ट्र व गुजरात सीमेलगतचे सव्‍‌र्हे नंबर २०३, २०४, २०५, २०६,२०७,  २७९ व २८०च्या परिसीमेचे मोजणीचे काम करण्यात येणार आहे. त्यानुसार भूमिअभिलेख तलासरी यांनी जिल्हाधिकारी पालघर यांना पत्राद्वारे कळवले आहे. या मोजणीच्या वेळी जिल्हा अधीक्षक, तलासरी तहसीलदार, गट विकास अधिकारी तलासरी, सार्वजनिक बांधकाम विभाग, सरपंच वेवजी, सरपंच सोलसुंभा (उंबरगाव), तलाठी आणि सीमेलगतच्या २६ खातेदारांना मोजणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना  दिल्या आहेत.

 भूमी अभिलेख  कार्यालयातील निमतानदार असिफ शेख, व भूकरमापक रवींद्र वडनेरे यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक वर्षांपासून रेंगाळलेला सीमा वादाचा प्रश्न सुटण्याच्या मार्ग मोकळा होण्याची आशा निर्माण झाली आहे.

काय आहे वाद?

तलासरी- उंबरगाव राज्यमार्गावर गुजरातच्या सर्वे क्रं. १७३ चा ३०० मीटरचा त्रिकोणी आकाराचा भुखंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला जोडला आहे.  ३०० मीटरनंतर हा रस्ता पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सर्वे क्र. २०४ ला जोडतो. मात्र या दोन्ही राज्यांची हद्द कायम नाही. परिणामी त्रिकोणी कोपऱ्याचा अधार घेऊन महाराष्ट्र सिमेत  १५०० मीटर गुजरात राज्याचे अतिक्रमण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीने  शैक्षणिक सोईचे कारण सांगून  महाराष्ट्राच्या वेवजी ग्रामपंचायतीला पत्र देऊन पथदिवेचे खांब उभारले.  मात्र या पथदिव्यांची सुविधा  गुजरातच्या इंडिया कॉलनीच्या रहिवाशांसाठी करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर येथील वेवजी ग्रामपंचायतीने सोलसुंभा ग्रामपंचायतीला महाराष्ट्राच्या हद्दीत उभारलेले विजेचे खांब काढण्याबाबत पत्राद्वारे खडसावून कळवले होते. तसा ग्रामपंचायतीने  ठरावही केला होता.  दरम्यान गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्राच्या वेवजी ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवून अतिक्रमण कायम ठेवले आहे. त्यामुळे जागा आपली असल्याचा दावा सोलसुंभाचे रहिवासी करीत आहेत.

दोन राज्यांचा वाद असल्याने कोणीही यामध्ये भाग घेत नाही. त्यामुळे रहिवाशांना वादाला तोंड द्यावे लागते. महाराष्ट्राच्या जागेत गुजरातला अतिक्रमण करु देणार नाही. आपण त्यासाठी दोन्ही राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. बलसाड महसूल अधिकारी त्या जागेचे कागदपत्र सादर करु शकले  नाहीत. सीमावाद असल्याने तोडगा निघत नसल्याने  सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. 

-अशोक रमण धोडी, वेवजी रहिवासी