पालघर: राज्यासह पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल संकेतस्थळावरून घोषित करण्यात आला असून पालघर जिल्ह्याचा निकाल ९७.१७ टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल जव्हार तालुक्याचा लागला असून तो ९८.५४ टक्के इतका आहे.

गेल्या वर्षी करोनास्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देऊन शाळेअंतर्गत मूल्यमापनाचे गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते. गेल्या वर्षी पालघर जिल्ह्याची दहावी उत्तीर्ण झालेल्याची टक्केवारी ९९.४ इतकी होती. तर यंदा हा निकाल ९७.१७ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टक्क्यांनी निकाल घसरला आहे.

heatwave in mumbai and thane mumbai
मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यात ९८.०७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९६.३९ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. २६ हजार ७२८ मुली तर २९ हजार ९६१ मुले उत्तीर्ण झाले आहेत. विक्रमगड तालुका सोडल्यास इतर सात तालुक्यांमध्ये ९५ टक्क्यांच्या वर निकाल लागलेला तर विक्रमगड तालुक्यात निकाल ९५ टक्क्यांच्या जवळपास आहे.

जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्याथी
तालुका बसलेले उत्तीर्ण टक्के
वाडा २८३१ २७२६ ९६.२९
मोखाडा १२४१ १२०८ ९७.३४
विक्रमगड २२६७ २१६६ ९५.५४
जव्हार १६५१ १६२२ ९८.५४
तलासरी ३३२९ ३२५४ ९७.७४
डहाणू ५४८६ ५२९७ ९६.५५
पालघर ८४९० ८१९७ ९६.५४
वसई ३३०४२ ३२२१९ ९७.५०
एकूण ५८३३७ ५६६८९ ९७.१७