डहाणू : घोळ ते धामटणे रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे रस्त्यालगत टाकलेली खडी चोरीला गेली आहे. त्यामुळे ठेकेदाराने लवकरात लवकर हे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. या रस्त्यावर खडी पसरल्याने रस्ता वाहतुकीसही धोकादायक बनलेला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत धामटणे येथे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यासाठी खडी आणि मुरूम साहित्य टाकण्यात आले आहे. महिन्याभरापूर्वीच खडी व मुरूम टाकून रोलिंग केले होते. पण हे काम पुन्हा बंद पडले आहे. त्याचा फायदा घेत चोरटे रस्त्यावरील मुरूम, खडी आदी साहित्य चोरून नेत आहेत. रात्रीच्या वेळी खडी चोरली जाते. त्यामुळे ठेकेदाराने या रस्त्याचे काम आणखीन न रखडवता तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2022 रोजी प्रकाशित
रस्त्यालगत टाकलेली खडी, मुरूम चोरीस; घोळ-धामटणे स्त्याची अवस्था वाईट
घोळ ते धामटणे रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे रस्त्यालगत टाकलेली खडी चोरीला गेली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 06-05-2022 at 00:05 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stones road pimples stolen state truth ahmedabad highway amy