पालघर : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या अर्चना उदार या तरुणीचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी प्रभाकर वाघरे (२२) यांने रात्री आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रभाकर वाघरे यांच्या कुटुंबीयांनी अर्चना उदार हिच्याशी लग्न करण्यासाठी मागणी टाकली होती. मात्र उदार कुटुंबीयांनी ती अमान्य करत अर्चनाचा विवाह अन्य ठिकाणी निश्चित केला होता. याबाबत मनात राग धरून त्याने ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Rohit Pawar reacts on crab case says I will not stop until I crush corrupt people
“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य

हेही वाचा – जिल्हा मुख्यालयाची समितीने केली एकांतात पाहणी; चौकशी गुंडाळण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी यांनी हाणून पाडला

अर्चना व प्रभाकर यांच्यात जुजबी मैत्री असल्याने हे अधूनमधून महाविद्यालय परिसरात भेटत असत. शुक्रवारी दुपारी प्रभाकर भेटण्यास आल्याने अर्चनाबरोबरच्या मैत्रिणी काहीच्या दूरवर जाऊन थांबल्या. एका पिशवीमध्ये कोयता घेऊन आलेल्या प्रभाकरने तिच्यावर हल्ला करून तिला ठार केले.

हेही वाचा – पालघर: खासदारांसाठी नवीन कार्यालयाचा शोध

या हल्ल्यानंतर प्रभाकर घटनास्थळावरून लगतच्या जंगलामध्ये पसार झाला. त्याच्याकडे भ्रमणध्वनी नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. मोखाडा पोलिसांनी ४० ते ५० स्थानिक तरुणांच्या मदतीने रात्रभर शोध सुरू ठेवला. त्याच्या घराजवळ असणाऱ्या एका तलावात त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. अशा प्रकारचा खुनी हल्ला होण्याचा जिल्ह्यात अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी अर्चनाचा वाढदिवस असताना त्याच दिवशी तिला संपवण्याचा डाव विफल ठरल्याची माहिती पुढे आली आहे.