भाजपचा धुव्वा; आसे गटात राष्ट्रवादी तर पोशेरा गटातून शिवसेना विजयी
कासा : पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोखाडा तालुक्यातील आसे गटातून राष्ट्रवादीचे हबीब शेख तर पोशेरा गटातून शिवसेनेच्या सारिका निकम विजयी झाल्या आहेत. जिल्ह्य़ात कोठेही न झालेली आघाडी मोखाडय़ात झाल्याने या ठिकाणी भाजपचा धुव्वा उडाला आहे.
मोखाडा तालुक्यातील या दोन्ही जागा गतसाली बिनविरोध निवडून येऊन या ठिकाणी पोशेरामध्ये
भाजप आणि आसेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार होते, मात्र या पोटनिवडणुकीत भाजपने ही जागा गमावली आहे. आसेमधून भाजपचे उमेदवार जयराम निसाळ यांना ४ हजार १४ तर राष्ट्रवादीचे हबीब शेख यांना ५ हजार ६७५ मते पडली. यानुसार शेख हे एक हजार ६३४ मतांनी विजयी झाले आहेत. मात्र या गटातील ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे एकूण चित्र होते.
दुसरीकडे पोशेरा गटात मात्र शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची निवडणूक पाहावयास मिळाली या गटात भाजपच्या किशोरी गाटे यांना ३ हजार ९८६ मते मिळाली, तर शिवसेनेच्या सारिका निकम यांना ४ हजार ३१३ मते मिळाली यानुसार ३२७ मतांनी निकम यांचा विजय झाला आहे.
आसे गटातील पक्षनिहाय आकडेवारी
पक्ष उमेदवाराचे नाव मतदानसंख्या
राष्ट्रवादी हबीब शेख ५६७५
भाजप जयराम निसाळ ४०१४
मनसे नीलेश फुफाणे ४०९
कॉंग्रेस सूरज शिंदे ३७६
पोशेरा गट
शिवसेना सारिका निकम ४३१३
भाजप किशोरी गाटे ३९८६
मनसे गायत्री दांडेकर ८३६
कॉंग्रेस हिरा पाटील ४९४