-
बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता करण जोहर लवकरचं स्टुडण्ट ऑफ दी इयर पार्ट टू घेऊन येत आहे. यात जुने नव्हे तर नवीन स्टुडण्ट सेलिब्रिटी दिसणार आहेत. बॉलिवूडमधील बातम्यांनुसार करणने आपले तीन स्टुडण्ट सज्ज केल्याचं समजतं.
-
या सिक्वलमध्ये सैफ अली खानची मुलगी सारा चित्रपटसृष्टीत आगमन करणार असल्याचं वृत्त आहे, तर श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरदेखील या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. (Instagram)
-
जान्हवीने चित्रपटात काम करावे म्हणून अलिकडेच करण जोहरने श्रीदेवीची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. (Instagram)
-
माध्यमांमधून झळकत असलेल्या जान्हवीच्या छायाचित्रांमुळे आगोदरपासूनच ती बॉलिवूडमधील बातम्यांमध्ये चमकत आहे. (Instagram)
-
फोटो शेअरींग साइट इंस्टाग्राम आणि टि्वटरवर गेल्या अनेक दिवसांपासून एका पाठोपाठ एक हॉट फोटो अपलोड करणारी जान्हवी आकर्षणाचा विषय ठरली आहे.
-
आई श्रीदेवी समवेत जन्हवी.
-
शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशानदेखील या चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
-
चित्रपटात ईशान सैफ अली खानची मुलगी साराबरोबर दिसणार असल्याचं समजतं.
-
'स्टुडण्ट ऑफ दी इयर' या पहिल्या चित्रपटात आलिया भट्टा, वरुण धवन और सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत होते.

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”