-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने ख्रिसमसचं निमित्त साधत चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.
-
शशांक केतकरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असून तो लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शशांकने ही माहिती दिली.
-
“सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण, सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तूंपैकी एखादी भेटवस्तू इतकी सुंदर असू शकते याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. तुम्हा सगळ्यांना आमच्या तिघांकडून हॅपी हॉलिडे आणि नाताळच्या शुभेच्छा”, अशी पोस्ट करत शशांकने गोड बातमी दिली.
-
शशांकने त्याच्या पत्नीसोबत प्रियांकासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाचं बेबीबंप दिसून येत आहे.
-
शशांक केतकर 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील श्री च्या व्यक्तीरेखेमुळे महाराष्ट्राला परिचित आहे.
-
यात तेजश्री प्रधानने जान्हवीची भूमिका रंगवली होती. या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रचंड हिट ठरली.
-
पडद्यावरची ही जोडी रिअल लाइफमध्ये विवाहबंधनात अडकली. पण हा विवाह फार काळ टिकला नाही. वर्ष-दोन वर्षातच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
-
त्यानंतर काही वर्षांनी शशांकच्या आयुष्यात प्रियांका ढवळे आली. शशांक आणि प्रियांकाची पहिली भेट फेसबुकवर झाली. चार वर्ष ते फेसबुक फ्रेंडच होते.
-
फेसबुकवर त्यांचं बोलण व्हायचं. प्रियांका एकदा 'गोष्ट तशी गमंतीची' या नाटकाला आली होती. तिथून त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलायला सुरुवात झाली.
-
पुढे त्यांच हे नात फुलत गेलं आणि त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”