
दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने कमाईच्या बाबतील अनेक रेकॉर्ड केले आहेत.

या चित्रपटात पुष्पाच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे.

अभिनेत्री कल्पलता यांनी ही भूमिका साकारली आहे.

कल्पलताने ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

कल्पलताने जवळपास १० टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केला आहे.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ‘पुष्पा: द राईज’ चित्रपटात अल्लू अर्जुनच्या आईची भूमिका साकारत तिने सर्वांनाच चकीत केले.

अल्लू अर्जुन आणि त्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीच्या वयात अवघ्या काही वर्षांचं अंतर आहे.

अल्लू अर्जुन आणि कल्पलता यांच्या वयात ३ वर्षांचं अंतर आहे.

अल्लू अर्जुनचं वय सध्या ३९ वर्षं आहे तर कल्पलता ४२ वर्षांची आहे.

या दोघांमध्ये अवघ्या तीन वर्षांचं अंतर असतानाही मोठ्या कौशल्यानं तिने अल्लू अर्जुनच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली आहे.

कल्पकता दोन मुलींची आई आहे.

एका मुलाखतीत तिनं खुलासा केला होता की, ती अवघ्या १४ वर्षांची असताना तिचं लग्न झालं होतं.

कल्पकता सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

कल्पकताच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.

‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

(सर्व फोटो सौजन्य : कल्पलता / इन्स्टाग्राम)