
अभिनेत्री कंगना रणौतच्या साडी लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.

डिझायनर साडी परिधान करून कंगनाने मोहक अंदाजात हटके फोटोशूट केलं आहे.

कंगनाने या फोटोशूटसाठी डिझायनर साडीसोबतच डिप नेक ब्लाऊज परिधान केला आहे.

तसेच तिने परिधान केलेले दागिने देखील विशेष लक्षवेधी आहेत.

यापूर्वी देखील कंगनाने साडीमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते.

साडीमधील तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला होता.

‘लॉक अप’ या रिएलिटी शोमुळे कंगना सगळीकडेच चर्चेचा विषय बनली होती.

या शोच्या माध्यमातून तिने पहिल्यांदाच सुत्रसंचालन केलं.

या शोदरम्यान कंगनाचा स्टायलिश अवतार पाहायाल मिळाला.

तसेच काही चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान देखील कंगना साडी लूकमध्ये दिसली.

साडीमधील तिच्या मोहक अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

पारंपरिक लूकमधील कंगनाला नेटकऱ्यांची देखील चांगलीच पसंती मिळत असते. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)