
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत समीर ही भूमिका साकारून संकर्षण प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

एक उत्तम अभिनेत्यासोबतच संकर्षण कवी आणि लेखकही आहे.

संकर्षणने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.

‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’या कार्यक्रमातून संकर्षणला प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर ‘माझीया प्रियाला’आणि ‘आभास हा’या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.

संकर्षणने अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनदेखील केलं आहे.

नुकतीच संकर्षणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

“हे माझ्या आयुष्यातलं पहिलं फोटोशूट आहे. पोझ, एक्प्रेशन सगळ्याचेच वांदे होते. जे काही छान दिसतंय ते फोटोग्राफरमुळे आहे.”, असं कॅप्शन देत संकर्षणने सगळ्यांचं कौतुक केलं आहे.

संकर्षणचं हे पहिलं वहिलं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

फोटोमधील संकर्षणच्या स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय.

(सर्व फोटो : संकर्षण कऱ्हाडे / इन्स्टाग्राम)