
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा आज वाढदिवस. करणने आता वयाची पन्नाशी गाठली आहे.

करणने त्याच्या करिअरबरोबरच फिटनेसकडेही अधिकाधिक लक्ष दिलं.

आजही त्याच्या दिवसाची सुरुवात वर्कआऊटने होते. करिअरच्या सुरुवातीलाच करणचं वजन अधिक वाढलं होतं. मात्र याकडे त्याने दुर्लक्ष न करता अधिक मेहनत घेतली.

त्याने जवळपास ४ महिन्यात १७ किलो वजन घटवलं. त्यासाठी करणने दिवस-रात्र मेहनत घेतली.

२०१७मध्ये करणच्या लूकमध्ये बराच बदल जाणवला. त्याने फिटनेस ट्रेनर कुणाल गिरची वजन कमी करण्यासाठी मदत घेतली.

उत्तम डाएट प्लॅन फॉलो करायचं करणने ठरवलं. इतकंच नव्हे तर त्याच्या फिटनेस ट्रेनरने स्विमिंगमध्ये त्याची असलेली आवड पाहून त्याच्या वर्कआऊटचं वेळापत्रक तयार केलं.

करण स्विमिंग पूलमध्ये अधिक वर्कआऊट आणि वेट ट्रेनिंग करायचा. यामुळे त्याला अधिक फिट होण्यास मदत मिळाली.

त्याच्या डाएटमध्ये भाजी, अंडी, प्रोटिन आणि कार्ब्सयुक्त पदार्थांचा देखील समावेश होता. करण ज्या अंड्यांचं सेवन करायचा ते अंड देणाऱ्या कोंबडीचं देखील एक वेगळं डाएट होतं. ही खरंच मजेशीर गोष्ट आहे.

करणने आपल्या चेहऱ्याचा कायापालट करण्यासाठी कॉस्मॅटीक सर्जरीचा आधार घेतला. त्याने एका मुलाखतीमध्ये स्वतःच याबाबत सांगितलं होतं. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)