-
भारतातील अनेक कलाकार आपल्या विनोदीबुद्धीसाठी ओळखले जातात.
-
याच विनोदबुद्धीच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच पण त्याचबरोबर मोठी संपत्तीही मिळवली.
-
भारतात सात असे विनोदवीर आहेत ज्यांच्या संपत्तीच्या पुढे भले-भले कलाकारही फेल ठरतील.
-
आज आपण भारतातील सर्वांत श्रीमंत विनोदी कलाकारांबद्दल जाणून घेऊया.
-
सुनील ग्रोव्हर हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक आहे. सुनीलची फॅन फॉलिविंगही खूप मोठी आहे.
-
सुनील ग्रोव्हरची एकूण संपत्ती जवळपास २१ कोटी रुपये आहे.
-
सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा भाचा कृष्णा हा देखील त्याच्या मामा इतकाच प्रसिद्ध आहे.
-
कृष्णा अभिषेकची एकूण संपत्ती जवळपास २२ कोटी रुपये इतकी आहे.
-
भारती सिंग आपल्या बिनधास्त वक्तव्य आणि राहणीमानासाठी ओळखली जाते.
-
भारतीची एकूण संपत्ती जवळपास २३ कोटी इतकी आहे.
-
अली अजगराला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ शोमधील ‘दादी’ या पात्रामुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
-
अली अजगराची एकूण संपत्ती जवळपास ३४ कोटी रुपये इतकी आहे.
-
राजपालने ‘हंगामा’, ‘चुप चुप के’, ‘ढोल’, ‘फिर हेरा फेरी’, ‘मालामाल विकली’, ‘भुल भुल्लैया’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
एक उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून तो घराघरात प्रसिद्ध असलेल्या राजपाल यादवची एकूण संपत्ती जवळपास ५० कोटी रुपये इतकी आहे.
-
कॉमेडीचे किंग असणारे जॉनी लिवर यांनी खूप कष्ट करून सिनेसृष्टीत यश मिळवलं आहे.
-
बॉलिवूडचा अविभाज्य भाग असणाऱ्या जॉनी लिवर यांची एकूण संपत्ती जवळपास २२७ कोटी रुपये इतकी आहे.
-
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या कार्यक्रमाने घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता म्हणजे कपिल शर्मा.
-
करियरची सुरवात स्टँडअप कॉमेडी ते थेट स्वतःचा कार्यक्रम असा त्याचा प्रवास होता.
-
हजरजबाबीपण, विनोदाचे उत्तम टायमिंग यामुळे तो प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला.
-
प्रेक्षकांच्या या लाडक्या विनोदवीराची एकूण संपत्ती तब्बल ३३६ कोटी रुपये इतकी आहे.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम

MLC Elections Result: “सत्यजीत तांबे भाजपात जाणार नाहीत, कारण…”, दीपक केसरकरांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “पाठिंबा.,,”!