-
काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होणार असून सध्या सगळीकडे ख्रिसमसच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे.
-
हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीदेखील आपली मुलगी पलक आणि मुलगा रेयांश यांच्याबरोबर ख्रिसमसची तयारी करते आहे.
-
श्वेता प्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारीही अतिशय सुंदर असून सौंदर्याच्या बाबतीत तिने आपल्या आईलाही मागे टाकले आहे.
-
पलक तिवारीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंबंधीचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये श्वेता आपल्या मुलांसह मजामस्ती करताना दिसत आहे.
-
श्वेता आणि पलक यावेळी ख्रिसमस ट्रीच्या शेजारी पोज देत आहेत. यावेळी तिघांनीही सॅन्टा कॅप घातल्या आहेत.
-
ख्रिसमस सण साजरा करत असतानाचे फोटो शेअर करताना पलकने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय “ख्रिसमस मूड.”
-
या तिघांनी मिळून आपले घर आणि ख्रिसमस ट्रीला सुंदर सजवले आहे. यावेळी ते वेगवेगळे खेळही खेळत आहेत.
-
पलकचे घर पूर्णपणे ख्रिसमसचा फील देत आहे. पलक दरवर्षी तिचे घर अशाच प्रकारे सजवते आणि फोटोही शेअर करते.
-
हे तिघेही ख्रिसमस लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. (सर्व फोटो: Instagram)

सत्यजीत तांबे प्रकरणावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे राजकारण झालं…”