-
अनुराग कश्यपचा ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डिजे मोहब्बत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अनुराग अलाया एफ आणि करण मेहता या दोन नवीन कलाकारांना लोकांसमोर आणत आहे.
-
अलायाचा पहिला चित्रपट नसला तरी एक मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा हा महत्वाचा चित्रपट आहे आणि करण मेहता हा नवीन चेहेरा अनुराग प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. करण या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
करणचे वडील राकेश मेहता हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक मोठे निर्माते आहेत, पण वडिलांच्या मदतीशिवाय स्वतःचं नाव कमवायचं ठरवलेल्या करणने तब्बल ७ वर्षं या क्षेत्रात मेहनत घेतली आहे.
-
वडिलांकडून थेट पाठिंबा नसला तरी या क्षेत्राची माहिती आणि ओळखीच्या लोकांशी संपर्क करणने वाढवला आणि हळूहळू तो या इंडस्ट्रीमध्ये रुळू लागला.
-
सलमान खान आणि शाहरुख खानच्या चित्रपटाच्या सेटवर त्याला काम करायची संधीदेखील मिळाली.
-
इतकंच नव्हे तर करणने शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ या दोन्ही चित्रपटात अभिनेता म्हणून कामही केलं, पण या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली नाही.
-
करणचा जन्म जर्मनीमध्ये झाला आणि शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली आणि मुंबईत झालं.
-
लहानपणापासूनच करणला शॉर्टफिल्म बनवायची आवड होती.
-
आज तब्बल ७ वर्षं मेहनत घेतल्यानंतर करणला अनुराग कश्यपच्या चित्रपटातून ब्रेक मिळत आहे. (फोटो सौजन्य : करण मेहता / इन्स्टाग्राम)
शाहरुखबरोबर केलं काम, वडील आहेत प्रसिद्ध निर्माते, तरी सात वर्षांनी मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक; अनुराग कश्यपचा ‘हा’ नवा हीरो कोण?
सलमान आणि शाहरुखच्या चित्रपटाच्या सेटवर त्याला काम करायची संधीदेखील मिळाली
Web Title: Who is anurag kashyaps almost pyaar with dj mohabbat films lead actor karan mehta avn