-
बॉलिवुडमधील झक्कास अभिनेता म्हणून अनिल कपूरची ओळख आहे. चित्रपटांप्रमाणे तो खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत येत असतो.
-
अनिल कपूरला सोनम आणि रिया अशा दोन मुली आहेत. सोनम अभिनेत्री आहे मात्र रियादेखील निर्माती आहे.
-
बहिणीसारखी ती फारशी चर्चेत नसते. रिया फक्त निर्माती नसून ती एक उत्तम फॅशन डिझायनर आहे.
-
रियाने मोठ्या पडद्यावर पदार्पण न करता पडद्यामागे आपले करियर बनवले. २०१० साली तिने ‘आयेशा’ चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.
-
‘आयेशा’ चित्रपटनानंतर तिने २०१४ साली खूबसूरत चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर बहिणीबरोबर तिने एका कपड्याचा ब्रँड सुरु केला.
-
करीना कपूर, सोनम कपूर, स्वर भास्कर अशा मल्टीस्टारकास्ट असलेल्या ‘वीरे द वेडिंग’ या चित्रपटाचीदेखील तिने निर्मिती केली आहे.
-
रियाकडे आलिशान गाड्यादेखील आहेत. मर्सिडीज बेंज एस४००, मर्सिडीज मेबैक एस ५०० सारख्या महागड्या गाड्या आहेत.
-
माध्यमांच्या माहितीनुसार रियाची एकूण संपत्ती ५ ते ६ मिलियन डॉलर इतकी आहे. निर्माती व फॅशन या दोन्ही क्षेत्रात सक्रीय असल्याने ती आज कोट्यवधींची मालकीण आहे.
-
रियाचा जन्म ५ मार्च १९८७ रोजी मुंबईत झालं आहे. करण बुलानीबरोबर तिने आपली लग्नगाठ बांधली.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
