-
Zee Chitra Gaurav 2023: यंदाचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा’ हा खूप अविस्मरणीय ठरणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता येणार आहेत.
-
अजून एक अप्रतिम गोष्ट म्हणजे मराठीतली सदाबहार जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर बऱ्याच काळानंतर एकत्र धमाकेदार सादरीकरण करणार आहेत.
-
या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’, ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे अभिनय सम्राट ‘अशोक सराफ’.
-
अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडत अनोखी मानवंदना दिली.
-
अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा’ खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे.
-
पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक.
-
एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा. जो आजही तेवढ्याच ताकदीने चालू आहे.
-
अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही.
-
अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे.
-
अशोक मामा, आमच्या आयुष्यातले अनेक क्षण सुंदर केलेत तुम्ही.
-
अशाच आणखी अजरामर भूमिका करण्यासाठी तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
-
आणि एवढं प्रचंड यश मिळवूनही तुमच्यासारखं साधं सरळ राहण्याची शक्ती आम्हाला मिळो
-
तुमच्या अभिनयाला आणि सच्चेपणाला झी मराठी परिवारातर्फे मानाचा मुजरा!
-
हा सोहळा प्रेक्षकांना रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. झी मराठीवर पाहता येणार.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी आणि निवेदिता अशोक सराफ / इन्स्टाग्राम)

“शिंदे-फडणवीसांची युती फोडायची नाहीतर…”, भावाच्या पक्षप्रवेशानंतर शशिकांत शिंदेंचा इशारा