-
‘अग्निसाक्षी’, ‘क्रांतीवीर’ आणि ‘तिरंगा’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये झळकलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना परिचयाची गरज नाही. त्यांनी आपल्या कामाने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे आणि वर्षानुवर्षे पडद्यावर अनेक चित्रपटातून काम करत आहेत.
-
नाना केवळ हास्यपटातच अभिनय करत नाहीत तर भावनिक आणि खलनायकी अभिनयही उत्तम करतात. पाटेकरांची प्रतिमा अतिशय संतुलित आणि निरोगी जीवनशैली पाळणारे अभिनेते म्हणूनही आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की नानांनी धूम्रपानाच्या व्यसनाशीही झुंज दिली आहे.
-
नुकतेच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. ते म्हणाले की, ते दिवसाला ६० सिगारेट सिगारेट ओढत असत आणि अशी ही वाईट धूम्रपानाची सवय कशी संपवली याबद्दलही त्यांनी खुलासा केला.
-
अभिनेते नाना पाटेकरांनी सांगितले की त्यांना एक मोठा मुलगा होता, ज्याचे नाव त्यांनी दुर्वासा ठेवले होते. त्यांना दुर्वासाबद्दल खूप विचार यायचे. लोक काय विचार करतील? याचे काय होईल? अशा विचारांमध्ये राहून त्यांची स्वतःच्या मुलाप्रती मानसिक भावना बदलून गेली होती.
-
अभिनेते पाटेकर म्हणाले, ” दुर्वासामध्ये जन्मापासूनचं काही गुंतागुंत होत्या, त्याच्या एका डोळ्याची समस्या होती, त्याला नीट दिसत नव्हते, त्याचे ओठ किंचित फाटलेले होते. मी त्याला पाहिल्यावर मला वाटायचे की, नाना हा कसा मुलगा असेल? याबद्दल लोक काय विचार करतील?” नाना पुढे म्हणाले, “त्याला काय वाटले किंवा कसे वाटले याचा मी विचारचं केला नाही. मी फक्त माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचा विचार केला. तो आमच्यासोबत अडीच वर्षे राहिला आणि मग तो हे जग सोडून गेला.”
-
अभिनेते नाना पाटेकरांनी पुढे सांगितले की, त्यांच्या मुलाच्या जाण्याने त्यांना खूप धक्का बसला. ते म्हणाले, “त्यावेळी मी दिवसातून ६० सिगारेट ओढायचो, अगदी अंघोळ करतानाही.
-
नाना पुढे म्हणाले, “माझ्या या सवयीमुळे खूप वाईट घडले, माझ्या गाडीमध्ये सिगारेटच्या दुर्गंधीमुळे कोणी बसायाला तयार नव्हते. मी दारूचे कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात सेवन केले नाही, परंतु सिगारेट मात्र मी खूप जास्त ओढायचो. मग मला एक दिवस माझ्या बहिणीने खोकताना पाहिले.”
-
त्यांनी पुढे सांगितले की त्यांना बहिणीने सांगितले की, “मला आता आणखी काय पहावे लागेल?” किंबहुना नानांच्या बहिणीनेही एक मुलगा गमावला होता. नाना पाटेकर पुढे म्हणाले की, त्यांच्या बहिणीचे हे शब्द हे ऐकून ते खूप भावूक झाले आणि त्यांनी सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला.(Photos Source: @iamnanapatekar/instagram)
(हे देखील वाचा: PHOTOS : इंडिया आघाडीने गाजवला अधिवेशनाचा पहिला दिवस; झाले खासदारांचे शपथविधी! वाचा माहिती)

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”