-
झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांचा महासंगम सुरू आहे.
-
या महासंगमाचे नाव भव्य मंगलमय सोहळा असे ठेवण्यात आले आहे. याचे कारण अर्थातच ‘पारू’ या मालिकेतील आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील जयंत आणि जान्हवीचा विवाह सोहळा पार पडणार आहे.
-
या विवाह सोहळ्याला सुरुवात झाली असून झी मराठीने जान्हवीचे हळदीच्या कार्यक्रमातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या लूकसाठी जान्हवी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकरने लाल रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर जान्हवीने लाल रंगाची ओढणी साडीप्रमाणे ड्रेप केली आहे.
-
नेटकऱ्यांचे वेधून घेणारे घटक म्हणजे जान्हवीने परिधान केलेले फुलांचे दागिने.
-
जान्हवीने या ड्रेसवर लाल आणि पिवळ्या रंगाच्या फुलांचे दागिने परिधान केलेले आहेत.
-
जान्हवीने या ड्रेसवर लाल आणि पिवळ्या रंगाच्या फुलांचे दागिने परिधान केलेले आहेत.
-
अभिनेत्रीने हातात हिरवा चुडा आणि सोन्याच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/ इंस्टाग्राम)

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”