-
व्हॉट्सअॅपमध्ये मीडिया कंट्रोल करण्यासाठी अनेक सेटिंग्ज आहेत. यामार्फत युजर्सना सर्व फोटोज, व्हिडिओज आणि अन्य मल्टीमीडिया कंटेंट्स कंट्रोल करता येतात. (Photo : Reuters)
व्हॉट्सअॅपमध्ये स्टोरेज स्पेस आणि डेटा वाचवण्यासाठी देखील अशीच एक सेटिंग दिली गेली आहे. याच सेटिंगबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (Photo : Reuters) इन्स्टंट मेसेजिंग अॅप असलेलं व्हॉट्सअॅप हे आपल्या युझर्सना एकाच वेळी सर्व चॅट्ससाठी ऑटो-डाउनलोड बंद करण्याचा पर्याय देतं. (Photo : Reuters) -
सामान्यतः व्हॉट्सअॅपवर रिसिव्ह झालेले सर्व फोटोज आणि व्हिडिओज डाउनलोड होतात आणि गॅलरीमध्ये सेव्ह होतात. मात्र, त्यामुळे डेटा तर खर्च होतो आणि स्टोरेज देखील संपतं. (Photo : Reuters)
-
याचसाठी व्हॉट्सअॅपमध्ये मीडिया व्हिजिबिलिटी हा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय बंद केल्याने फोन गॅलरीमध्ये डाउनलोड झालेला सर्व कंटेंट निघून जातो. (Photo : Reuters)
-
दरम्यान, व्हॉट्सअॅपवर ही मीडिया सेटिंग्ज वापरण्याकरिता तुमच्याकडे व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन आणि अॅक्टिव्ह अकाउंट असणं आवश्यक आहे. (Photo : Reuters)
-
व्हॉट्सअॅपचं ऑटो डाउनलोड बंद करण्यासाठी व्हॉट्सअॅप सुरु करून सर्वप्रथम उजव्या बाजूस वरच्या बाजूला दिसणार्या तीन ठिपक्यांमधून सेटिंग्जवर जा. (Photo : Indian Express)
-
तिथून स्टोरेज आणि डेटा या ऑप्शनवर टॅप करा आणि मीडिया ऑटो-डाउनलोड सेक्शनमध्ये जा. (Photo : Indian Express)
पुढे मोबाइल डेटा, वायफाय आणि रोमिंगसाठी दिलेल्या पर्यायांसमोरील सर्व बॉक्स अनचेक करा. यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देखील सेटिंग ठेवू शकता. (Photo : Indian Express) -
-
त्याचप्रमाणे, जर तुमाला एकाच चॅटची मीडिया व्हिझीबिलिटी बंद करायची असल्यास ती चॅट ओपन करा.त्या चॅटच्या नावावर टॅप करा. तिथे मीडिया व्हिझीबिलिटीचा पर्याय शोधा आणि बंद करा. (Photo : Indian Express)

८ फेब्रुवारी पंचांग: जया एकादशीला लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वादाने कर्क, कन्या राशीला होईल लाभ; तुमचे नशीब आज बदलणार का ?