
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीयेचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र मानला जातो.

या दिवसाचे हिंदू परंपरेत खूप महत्वाचे स्थान आहे. या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते.

अक्षय्य तृतीयेची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला पसंती दर्शवतात. पण या दिवशी सोने खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.

सोनं शुद्ध आहे का? हे पडताळणं महत्वाचे आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

चुंबकाचा वापर – लोखंड चुंबकाकडे आकर्षित होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मात्र सोनं चुंबकाकडे आकर्षित होत नाही. (प्रातिनिधिक फोटो : Pixabay)

त्यामुळे जर सोनं चुंबकाकडे आकर्षिले गेले तर त्या सोन्यात भेसळ आहे असे सहज समजू शकते. (प्रातिनिधिक फोटो : Pixabay)

अॅसिड टेस्ट – एखाद्या टोकदार वस्तूने सोन्याच्या दागिन्यावर पिनांच्या सहाय्याने ओरखडा ओढा. त्यावर अॅसिडचा थेंब टाका. (प्रातिनिधिक फोटो : Pixabay)

थेंब टाकल्यावर जर दागिना हिरवा झाला तर समजून घ्या की तो दागिना बनावट आहे. कारण सोन्यावर कोणत्याही धातूचा परिणाम होत नाही. (प्रातिनिधिक फोटो : Pixabay)

हॉलमार्कचं चिन्ह पाहा – सोन्याच्या शुद्धीकरणासाठी हॉलमार्कचे चिन्ह पाहणं गरजेचं आहे. एजन्सी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही तपासणी करते.

कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी या एजन्सीकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असते. त्यानंतर त्यावर हॉलमार्क दिला जातो.

मात्र काही विक्रेते हॉलमार्कचे खोटे चिन्हही वापरतात. त्यामुळे हॉलमार्क खरा आहे की नाही तेही तपासून घेणे गरजेचे आहे.

खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोचे त्रिकोणी चिन्ह असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही आणि ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष तसेच उत्पादकाचा लोगोही असतो. (All Photo : Indian Express)