-
अनेक विकारांवर मात करणारा बीट काहींसाठी मात्र फारच घातक ठरू शकतो. जर का तुम्हालाही खालीलपैकी कोणते त्रास असतील तर चुकूनही बीटचे सेवन करू नका. (फोटो: Pixabay)
-
बीट मध्ये ऑक्सालेटचे प्रमाण अधिक असते यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. जर तुम्हाला अगोदरच मुतखड्याचा त्रास असेल तर बीट खाणे टाळावे. (फोटो: संग्रहित/Pixabay)
-
बीट मध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स 61 असल्याने मधुमेह रुग्णांनी बीटचे सेवन टाळावे किंवा निदान कमी प्रमाणात घ्यावे. बीटमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. (फोटो: संग्रहित/Pixabay)
-
खरंतर मधुमेह रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते, त्यासाठी बीट फायदेशीर ठरू शकते पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (फोटो: संग्रहित/Pixabay)
-
जर का तुम्हाला रक्तदाबासही संबंधित त्रास असतील तर बीट सेवनाने रक्तदाब कमी होतो. बीट मधील नाईट्रेट मुळे असे होते. (फोटो: संग्रहित/Pixabay)
-
गरोदरपणात बीटमधील नाईट्रेट गर्भाच्या वाढीसाठी हानिकारक ठरते. (फोटो: संग्रहित/Pixabay)
-
पोस्टपार्टम दरम्यान बीटच्या सेवनानाने जर डोळे, तोंड, ओठ व हातापायाच्या भोवती त्वचा काळीनिळी पडण्याचे त्रास होतात (फोटो: संग्रहित/Pixabay)
-
पोस्टपार्टम मध्ये म्हणजे प्रसूतीनंतर बीट खाणे टाळावे. बीटमुळे रक्तातील मेथोग्लोबीन वाढून डोकेदुखी ,चक्कर येणे असे त्रास वाढतात.(फोटो: संग्रहित/Pixabay)
