-
आजकाल अनेकजण वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असतात, बदललेली जीवनशैली यामागचे कारण असू शकते. वजन वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
-
वजन वाढल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जराही वजन वाढले की ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसतात.
-
काहीजण तर इतके कठीण वाटणारे डाएट फॉलो करतात, की त्याचा विपरीत परिणाम होतो. थकवा, अशक्तपणा अशी लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक मिळणे आवश्यक असते.
-
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही भारतीय पदार्थ फायदेशीर ठरू शकतात, कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.
-
वरण आणि भात : वरण आणि भात यांच्या आपल्या जेवणात समावेश असतोच. अगदी आजारी असणाऱ्या व्यक्तींनाही हलका आणि सकस आहार म्हणून वरण आणि भात दिला जातो.
-
वरण आणि भात हे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचे उत्तम स्रोत मानले जाते. यामध्ये तूप देखील घालू शकता. वजन कमी करण्यासाठी तूप टाळावे असा गैरसमज अनेकांना असतो. पण दिवसभरात एक चमचा तूप खाल्ल्याने ते सहज पचू शकते, तसेच यामुळे शरीरासाठी चांगले असणारे फॅट्सही मिळते.
-
इडली आणि सांबर : इडली आणि सांबर यामध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात. इडली वाफेवर बनवली जाते तर सांबरमध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांचा समावेश होतो ज्यामुळे शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे पोषकतत्व मिळतात.
-
इडली आणि सांबर यांमुळे वजन वाढण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आहारात याचा समावेश करू शकता.
-
राजमा आणि भात : वरण भाताप्रमाणे भाताबरोबर राजमा खाणेही अनेकांना आवडते. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आढळतात.
-
राजमा आणि भात खालल्याने पोट लगेच भरते आणि खूप वेळासाठी भूक लागत नाही. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही याचा डायटमध्ये समावेश करू शकता.
-
दलिया : दलिया हा देखील एक पौष्टिक पदार्थ आहे, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. (सर्व फोटो सौजन्य : Freepik)

“तो माझ्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर…” ‘गंदी बात’फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत