-
सोनं ही एक धातू आहे जी जगातील जवळजवळ प्रत्येक देश संचयित करू इच्छित आहे. लोक सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.
-
भारतात २०२३ च्या सुरुवातीलाच सोन्याने उच्चांकी पातळी ओलांडली आहे. जागतिक पातळीच्या अनुषंगाने सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. दुबईचे नाव ऐकल्यानंतरच लोक सोन्याची खरेदी करण्यापर्यंत पोहोचतात.
-
दुबईमध्ये दिएरा नावाचे एक ठिकाण आहे, जिथून तुम्ही सहजपणे कमी किंमतीत सोने खरेदी करू शकता. पण तुम्हाला माहितेयं का भारतातही असे ठिकाण आहे, जिथून तुम्ही स्वस्त दरात सोने खरेदी करु शकता, चला तर जाणून घेऊया कोणते आहे हे ठिकाण…
-
भारतात सोन्याची खाण जास्त नाहीत. जवळपास सर्व सोने देशात आयात केले जाते. हे सोने स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, येस बँक, युनियन बँक इत्यादी काही मोठ्या बँकांकडून आयात केले जाते.
-
भारतातील प्रत्येक शहरात सोन्याचे भाव एकसारखे नसतात. देशाच्या वेगवेगळ्या सराफा बाजारात २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत वेगळी आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे राज्य सरकार आणि प्रशासनाने सोन्यावर लादलेला स्थानिक कर, जो प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगळा आहे.
-
देशातील सर्वात स्वस्त सोनं केरळमध्ये मिळतं. केरळमधील कोचीन शहरात तुम्हाला मलबार गोल्ड, भीमा ज्वेलर्स, जोयलुकास यांसारख्या ठिकाणाहून कमी किंमतीत सोनं खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
-
दक्षिण भारतातील बहुतेक राज्यांत सोन्याची किंमत पश्चिम आणि उत्तर भारताच्या तुलनेत कमी आहे. कर्नाटक आणि केरळमध्ये मुंबई किंवा दिल्लीपेक्षा स्वस्त सोनं आहे. दिवाळीपूर्वी धनतेरसनिमित्त इथल्या बाजारपेठांची चमक वेगळी आहे. येथे नवीन दागिन्यांपेक्षा जुन्या सोन्याचे दागिने बदलण्याचा ट्रेंड आहे.
-
स्थानिक सराफा असोसिएशन देखील त्यांच्या वतीने सोन्याचे दर ठरवते. यामुळे, सोन्याच्या किंमती एका शहराहून दुसर्या शहरात बदलतात. इतकेच नव्हे तर दररोज दोनदा सोन्याच्या किंमती सुधारित केल्या जातात. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याच्या किंमतींचा कल दिसून येतो.
-
(फोटो सौजन्य -संग्रहित छायाचित्र)
लग्नसराईत सोनं खरेदी करताय? देशातील ‘या’ शहरात मिळतं सर्वात स्वस्त सोनं! होणार पैशांची बचत
Cheapest Price for Gold in India: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्हालाही बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल, तर देशातील ‘या’ शहरात सर्वात स्वस्त सोनं विकलं जातय…
Web Title: The price of gold is at the lowest in kerala similarly the prices are reasonable in karnataka when compared to delhi and mumbai pdb