-
एक प्रयोग म्हणून आपण एक महिनाभर भात खाणे बंद करून शरीरात काय बदल होऊ शकतात हे पाहण्याचा हा प्रयत्न..
-
श्री बालाजी ऍक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य पोषणतज्ज्ञ प्रिया भरमा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “जेव्हा तुम्ही एका महिन्यासाठी भात सोडून देता, तेव्हा तुमच्या शरीरात कॅलरी कमी झाल्यामुळे वजन कमी होऊ शकते. उच्च-कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी झाल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होऊ शकते.”
-
वरिष्ठ आहारतज्ज्ञ , वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड रिया देसाई यांनी सुद्धा अनुमोदन देत सांगितले की, “एका महिन्यासाठी तांदूळ पूर्णपणे सोडून दिल्यास काही प्रमाणात वजन कमी होऊ शकते. रक्तातील ग्लुकोजची पातळी अधिक असल्यास तुम्हाला भात खाणे सोडून देण्याची मोठी मदत होऊ शकते.”
-
पण जेव्हा तुम्ही आहारातून तांदूळ काढून टाकता केवळ त्याच कालावधीसाठी रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. भात पुन्हा खायला सुरुवात केली की, ग्लुकोजच्या पातळीत पुन्हा चढ-उतार होऊ लागते
-
पचनप्रक्रियेवर परिणाम: भात न खाल्ल्याने होणाऱ्या नुकसानाविषयी तज्ज्ञ सांगतात की,”तांदळाच्या अभावाने फायबरचे प्रमाण कमी झाल्यामुळे पचनक्रियेवरही परिणाम होऊ शकतो
-
वजन कमी होईल पण का? उर्जा उत्पादनासाठी कार्ब्स अत्यंत आवश्यक आहेत आणि ते पूर्णपणे काढून टाकणे हे शरीराला कमकुवत बनवू शकते. कार्ब्सच्या अभावी शरीर उर्जा निर्माण करण्यासाठी स्नायूंमधील प्रथिने वापरण्यास सुरवात करते. शरीराच्या अन्य गरजांसाठी लागणारी जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता देखील जाणवते. भात खाणे बंद केल्याने कमी झालेले वजन हे चरबी नसून स्नायू कमकुवत होण्याचा परिणाम असू शकतो.
-
रिया देसाई यांनी सांगितले की, “तांदूळ कार्ब्स, बी जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा स्रोत असल्याने पौष्टिक ठरू शकतो.”
-
एक लहान वाटी भात योग्य पद्धतीने खाल्ल्याने शरीराला कोणतीही हानी होत नाही, आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेणे चुकीचे आहे. मुळात भात कसा खावा हे समजून घेणे आवश्यक आहे
-
पोर्शन कंट्रोल: मर्यादित प्रमाणात खा कारण तुम्ही काय खाता याइतकाच तुम्ही किती खाता हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे
-
कार्ब्ससह फायबर व प्रथिने जोडा: भाज्या, बिया आणि सुक्यामेव्याच्या स्वरूपात फायबर तसेच विविध डाळींच्या रूपात प्रथिने आहारात जोडल्याने तुम्हाला संतुलित डाएट साकारता येऊ शकते.
-
काही विशिष्ट कारणांनी तुम्हाला भात पूर्णपणे टाळण्यास सांगितले असल्यास त्याचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
आपण तांदळाच्या आरोग्यदायी पर्यायांमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असलेले क्विनोआ, कमी कार्बोहायड्रेट असलेले तांदूळ, बल्गुर किंवा बार्ली, शेंगा आणि रताळ्याचा समावेश करू शकता.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case