-
तूप रोटी खाते आणि धष्टपुष्ट होते.. अशी आजीबाईची कहाणी आपणही लहानपणी ऐकली आहे.आणि आता आहारतज्ज्ञ सुद्धा तूप पोळी खाण्याबाबत आजीने दिलेला सल्ला योग्यच आहे असं सांगत आहेत.
-
प्रमाणित पोषणतज्ञ आंचल सोगानी यांनी इन्स्टाग्रामवर दिलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, प्रमाणात तुपाचे सेवन केल्यास याचे आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. अगदी वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे तूप कामी येऊ शकतात
-
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनीही इंस्टाग्रामवर लिहिले की, “डाळ, तांदूळ, भाकरी, भात आणि पोळ्यांमध्ये तूप वापरल्यास अत्यावश्यक फॅटी ऍसिड व व्हिटॅमिन डी, ए आणि ई मिळू शकतात.
-
पोळीमध्ये (गव्हाच्या) असणाऱ्या फायबरला तुपाची जोड मिळाल्याने पचनप्रक्रियेला हातभार लागतो. तुपामुळे पाचक एन्झाइम्स आतड्यांमध्ये सोडले जातात ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे त्रास दूर होण्यास मदत होते.
-
तुपामुळे पोळीला एक विशिष्ट प्रकारचा गंध व चव मिळते, तसेच खाताना जिभेला जाणवणारा पोत सुद्धा सुधारण्यास मदत होते
-
तूप पोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यास मदत करते. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) ही कार्बोहायड्रेट्स असलेल्या खाद्यपदार्थांची रेटिंग प्रणाली आहे. प्रत्येक अन्न सेवन केल्यावर तुमच्या रक्तातील साखरेची (ग्लूकोज) पातळी किती प्रभावित होते हे या इंडेक्समुळे लक्षात येते.
-
तुपातील अँटिऑक्सिडंट्स हे अनेक रॅडिकल्सवर मात करण्याचे काम करतात त्यामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
-
जेव्हा तुम्ही भात किंवा पोळीबरोबर तुपाचे सेवन करता तेव्हा मूळ आहारातील पोषकसत्व शरीरात अधिक उत्तमरीत्या शोषून घेण्यास मदत होते
-
एका पोळीसाठी एक छोटा चमचा तूप वापरणे ठीक आहे. लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट जास्त केली तर ती शरीरासाठी हानिकारक असते. शक्यतो तूप पोळी साखर न लावताच खावी. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case