-
हिवाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. तुम्हाला तुमच्या आहारात पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामध्ये आवळ्याचा सुद्धा प्रामुख्याने समावेश असते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
हिवाळ्याच्या दिवसात आवळ्याचे सेवनदेखील फायदेशीर ठरू शकते. आवळा हे तुरट, आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे अत्यंत औषधी फळ आहे. त्यातच ट्रेनमध्ये मिळणाऱ्या आवळ्याच्या गोळ्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीच्या आहेत. तर आज आपण ‘आवळा गोळी’ घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. (फोटो सौजन्य : @Pixabay)
-
आवळा गोळी बनवण्यासाठी आवळे – ८ ते १० (साधारण एक कप गर निघाला पाहिजे ) किंवा (शिजवून साधारण एक कप गर), गुळ – आवळ्यांच्या प्रमाणात किंवा (१ कप), १ चमचा जिरेपूड, पाव चमचा वेलचीपूड, एक ते दीड चमचा मीठ, अर्धा चमचा काळ मिठ, एक चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
आता सगळ्यात पहिला आवळे स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये थोडं पाणी घाला आणि आवळे थोडे वाफवून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यातील बिया काढून टाका व छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
पॅनमध्ये आवळ्याची पेस्ट व बारीक केलेला गूळ घालून दोन मिनिटे परतून घ्यावी. हे मिश्रण सात ते आठ मिनिटे चांगले परतवून घ्या. मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर त्यात जिरं, मीठ व वेलचीपूड घालून मिक्स करून घ्या. मिश्रण पॅनला चिकटणं बंद झालं की गॅस बंद करावा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्यानंतर हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेऊन थंड करण्यास ठेवा. नंतर एका छोट्या प्लेट मध्ये पिठीसाखर पसरवून घ्या व मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर हाताला पिठी साखर लावून हव्या तश्या लहान मोठ्या आकाराच्या गोळ्या बनवून घ्याव्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
सर्व गोळ्या बनवून झाल्यानंतर पिठीसाखरेत त्या घोळवून घ्या व थोडा वेळ तश्याच सुकण्यासाठी ठेवाव्यात. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
नंतर या गोळ्या हवाबंद डब्यात भरून ठेवा.अशाप्रकारे तुमच्या ‘आवळा गोळी’ तयार.(फोटो सौजन्य : @Freepik)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल