-
अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराचे उदघाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
-
२२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना पत्र पाठवण्यात आली आहेत
-
श्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही निमंत्रित केले आहे.
-
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन हे देखील उपस्थित राहणार आहेत.
-
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
-
रामायणातील पुरुषोत्तम रामाच्या भूमिकेत घरोघरी लोकप्रियता मिळवणारे अभिनेते अरुण गोविल यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे.
-
दीपिका चिखलिया यांनी ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत.
-
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हे भाग्य लाभले आहे. त्याही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
-
कंगना राणौतबद्दल सांगायचे तर ती अयोध्येतील रामललाच्या भव्य सोहळ्यालाही उपस्थित राहणार आहे.
अयोद्धेतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी येणार ‘हे’ सेलिब्रिटी; पाहा कोणाला आहे आमंत्रण
अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराचे उदघाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीआधी मंदिर खुले होणार असल्यामुळे याकडे संबंध देशाचे लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीसह इतर ८००० व्यक्तींना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
Web Title: Ram mandir pran pratishtha ceremony ayodhya temple program invite bollywood celebrity mb ieghd import vvk