-
१८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनाचं कामकाज पुढील १० दिवस चालणार आहे. दरम्यान १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनावेळी खासदारांच्या शपथविधीवरून वाद निर्माण झाले होते. काय घडलं होतं? जाणून घेऊयात.
-
शपथविधी सोहळ्याची चर्चा देशभर रंगली होती. बहुमतात असलेल्या भाजपाच्या खासदारांनी विरोधकांना जशास तसे उत्तर देत जय श्रीराम असे नारे लगावले होते. शपथविधी सोहळ्यातील धार्मिक घोषणांची सुरवात झाली पश्चिम बंगालमधील नवनिर्वाचित खासदार शपथ घेण्यास उभे राहिल्यानंतर. याला पार्श्वभूमी होती लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान झालेल्या खडाजंगीची. भाजपा आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची पश्चिम बंगालमधील लढाई देशभर चर्चेत राहिली होती. तृणमूलचे खासदार शपथ घेताना भाजपाच्या खासदारांकडून जय श्रीराम अशी शेरेबाजी करणात येत होती, त्याला उत्तर म्हणून तृणमूल खासदारांनी जय हिंद, जय बंगाल, जय मा दुर्गा, आणि जय ममता अशा घोषणा लगावल्या होत्या.
-
२०१९ मधील पक्षनिहाय खासदारांची संख्या
भाजपा ३०३, काँग्रेस ५२, डीएमके २३, वायएसआरसीपी २३, तृणमूल काँग्रेस २२, शिवसेना १८, जनता दल युनायटेड १६, बीजेडी १२, बीएसपी १०, समाजवादी पार्टी ०५, सीपीआय (एम) ३, देशातील या सर्व एकूण ५४२ लोकसभा मतदारसंघांच्या प्रतिनिधींचा पहिल्या अधिवेशनात कामकाजाप्रमाणे शपथविधी सोहळा पार पडला होता. -
या शपथविधी दरम्यान, अनेक सदस्यांनी धार्मिक घोषणाबाजी केल्यावरून लोकसभा अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
-
नेमकं काय घडलं होतं?
१७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जय श्रीराम, अल्लाह हू अकबर, ओम नमः शिवाय यासारख्या धार्मिक घोषणांनी गाजले होते. -
पश्चिम बंगालमधील नवनिर्वाचित खासदार अभिषेक बॅनर्जी शपथविधीला उभे राहिल्यावर भाजपाच्या सदस्यांकडून जय श्रीराम अशी घोषणाबाजी केल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. नंतर होणार्या सर्व शपथविधी कार्यक्रमात धार्मिक घोषणांचे सत्रच सुरु झाले होते. संसदेत जय श्रीराम, अल्लाह हू अकबर, ओम नमः शिवाय आणि जय मा काली असे नारे खासदारांनी शपथविधी दरम्यान दिले आणि शपथविधी संपवतानाही धार्मिक घोषणा दिल्या.
-
यामध्ये तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जय मा दुर्गा आणि जय ममता अशी घोषणा दिली.
-
तर तृणमूलचेच खासदार अबू ताहेर खान यांनी अल्लाह हू अकबर अशी घोषणा देऊन शपथविधी संपवला.
-
याशिवाय डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी शपथ सुरु करण्याआधी वजगा तमिळ, वजगा पेरियार अशी घोषणा दिली.
-
शपथविधीवेळी समाजवादी पार्टीचे खासदार शफिकुर रेहमान बर्क यांनी वंदे मातरम घोषणा देऊ शकत नाही असं मत व्यक्त करताना ते इस्लाम धर्माविरुद्ध असल्याचं सांगितलं होतं.

Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, आश्चर्य वाटतं…”