
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाची मैत्रीण विनी रमनसोबत लग्नगाठ बांधली.

मॅक्सवेल आणि विनी यांचा विवाह १८ मार्चला एका खाजगी समारंभात झाला.

दोघांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत आणि त्याला ‘मिस्टर आणि मिसेस मॅक्सवेल’ असे कॅप्शन दिले आहे.

२०२० मध्ये विनी आणि मॅक्सवेलचा साखरपुडा झाला होता.

विनी आणि मॅक्सवेल २०१७ पासून एकत्र आहेत.

मूळची भारतीय असणारी विनी ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहे.

इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार विनी एक फार्मासिस्ट आहे.

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

(सर्व फोटो सौजन्य : ग्लेन मॅक्सवेल, विनी रमन / इन्स्टाग्राम)